पैठण : पंथेवाडी येथे परप्रांतीय तरुणाने केले अल्पवयीन तरुणीचे अपहरण

पैठण पुढारी वृत्तसेवा : पैठण शहरातील पंथेवाडी शिवारामध्ये असणाऱ्या वीटभट्टी जवळून एका १३ वर्षाच्या अल्पवयीन परप्रांतीय तरुणाने तरुणीचे अपहरण केल्याची घटना शनिवारी (दि.२५) समोर आली आहे. दिलीप मांगेलाल गौतम (रा.डिबीया, मध्यप्रदेश) असे या तरुणाचे नाव आहे. या घटना प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या बद्दल पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, …

पैठण : पंथेवाडी येथे परप्रांतीय तरुणाने केले अल्पवयीन तरुणीचे अपहरण

पैठण Bharat Live News Media वृत्तसेवा : पैठण शहरातील पंथेवाडी शिवारामध्ये असणाऱ्या वीटभट्टी जवळून एका १३ वर्षाच्या अल्पवयीन परप्रांतीय तरुणाने तरुणीचे अपहरण केल्याची घटना शनिवारी (दि.२५) समोर आली आहे. दिलीप मांगेलाल गौतम (रा.डिबीया, मध्यप्रदेश) असे या तरुणाचे नाव आहे. या घटना प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या बद्दल पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पैठण शहरातील पंथेवाडी शिवारात वीटभट्टीवर दिलीप हा मजुरी काम करण्यासाठी आला होता. दिलीपने वीटभट्टीवर काम करत असलेल्या मुलीला फुस लावून तीचे अपहरण केले. यानंतर अदिवासी कुटुंबातील १३ वर्षाच्या अल्पवयीन तरुणीचे या तरुणाने वीटभट्टीवरून फुस लावुन अपहरण करण्यात आल्याची तक्रार बुधवारी (दि.२९) पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्याकडे दाखल करण्यात आली.
पैठण पोलीस ठाण्यात सदर अल्पवयीन तरुणावर अल्पवयीन तरुणीला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरुकुल हे करीत आहे.
हेही वाचा :

Seed Treatment | शेतकऱ्यांना बीजप्रक्रियेचे मिळणार धडे
परभणी: मुलीस पळवून नेणाऱ्या तरुणाला ३ दिवसांची कोठडी
T20 वर्ल्ड कप : टीम इंडियाचा सराव सुरू,हार्दिक पंड्या न्यू यॉर्कमध्ये दाखल