कोल्हापूर : कळे बाजारपेठेत ऐन उन्हाळ्यात विजेचा लपंडाव; व्यापाऱ्यांचे नुकसान

कळे; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरच्या पश्चिम भागातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या कळे (ता.पन्हाळा) येथील बाजारपेठेमध्ये ऐन उन्हाळ्यात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे. वारंवार खंडीत होणाऱ्या विजेमुळे व्यापाऱ्यांना आर्थिक भुर्दंड तर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महावितरणने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा बुधवारी (दि.२९) कळे ग्रामस्थांनी दिला आहे. …

कोल्हापूर : कळे बाजारपेठेत ऐन उन्हाळ्यात विजेचा लपंडाव; व्यापाऱ्यांचे नुकसान

कळे; Bharat Live News Media वृत्तसेवा : कोल्हापूरच्या पश्चिम भागातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या कळे (ता.पन्हाळा) येथील बाजारपेठेमध्ये ऐन उन्हाळ्यात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे. वारंवार खंडीत होणाऱ्या विजेमुळे व्यापाऱ्यांना आर्थिक भुर्दंड तर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महावितरणने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा बुधवारी (दि.२९) कळे ग्रामस्थांनी दिला आहे.
कळे वीज वितरण केंद्रातून परिसरातील अनेक गावांना वीजपुरवठा केला जातो. पण उन्हाळा सुरु झाल्यापासून गेल्या दिवसांपासून वीजपुरवठा अनियमित सुरु आहे. दुरुस्ती व लाईन फॉल्टच्या नावाखाली दररोज वीज खंडीत केली जाते. दुरुस्तीसाठी सोमवार राखीव दिवस असूनही इतर दिवशीसुद्धा वीज पुरवठा वारंवार खंडीत केला जात आहे. लाईन फॉल्ट झाल्यावर तर एकदा गेलेली वीज तीन-चार तास येत नाही. नागरिकांना पूर्वकल्पना न देता दिवसभर वीजपुरवठा बंद झाल्याने सर्वांच्याच कामाचा खोळंबा होत आहे.
ऐन उन्हाळ्यात लग्नसराई सुरु असल्याने कळे बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत आहे. पण विजेमुळे व्यापारीवर्गाला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. वीजपुरवठा बंद झाल्याने मोबाईल, दूरध्वनी, इंटरनेट, झेरॉक्स आदी बंद राहिल्याने दैनंदिन व्यवहारांवर मर्यादा येत आहेत. शिवाय बहुतांशी व्यवसाय वीजेवर अवलंबून असल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान होत आहे. ऐन उन्हाळ्यात वीज नसल्याने नागरिकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. कळे येथील वीज वितरण केंद्रातून इतरस्त्र वीजपुरवठा केला जातो. पण कळे बाजारपेठेत मात्र विजेच्या पुरवठयाबाबत दूजाभाव केला जात असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. महावितरणने वीजपुरवठ्याबाबत दखल न घेतल्यास कळे ग्रामस्थ व व्यापाऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा :

कोल्हापूर : डोक्यात कुदळ घालून जन्मदात्या आईचा खून; मुलाला अटक
कोल्हापूर : वय वर्षे 16… वाहनचोरीचे गुन्हे 12
कोल्हापूर : दुर्गंधीमुळे कोंडला सीपीआरचा श्वास