नागपूर : दोन महिलांना कारची जबर धडक, व्हिडिओने खळबळ

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील कल्याणीनगर भागात भरधाव पोर्श कार चालवत अल्पवयीन मुलाने तरुण आणि तरुणीला चिरडले. या ‘हिट न रन’ प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटले. वडील आणि आजोबाला भारी पडलेल्या या अति लाडाच्या मस्तवाल नातवाविरोधात,लाचखोर,भ्रष्ट पोलीस आणि डॉक्टर विरोधात समाजात तीव्र संताप उमटल्याचे पाहायला मिळाले. नागपुरातील राम झुल्यावर झालेल्या अपघाताचेही पडसाद उमटले. आरोपी चालक महिलेचा …

नागपूर : दोन महिलांना कारची जबर धडक, व्हिडिओने खळबळ

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : पुण्यातील कल्याणीनगर भागात भरधाव पोर्श कार चालवत अल्पवयीन मुलाने तरुण आणि तरुणीला चिरडले. या ‘हिट न रन’ प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटले. वडील आणि आजोबाला भारी पडलेल्या या अति लाडाच्या मस्तवाल नातवाविरोधात,लाचखोर,भ्रष्ट पोलीस आणि डॉक्टर विरोधात समाजात तीव्र संताप उमटल्याचे पाहायला मिळाले. नागपुरातील राम झुल्यावर झालेल्या अपघाताचेही पडसाद उमटले.
आरोपी चालक महिलेचा जामीन फेटाळला गेला. गेल्या काही दिवसांपासून नागपुरातही अशाच प्रकारच्या काही घटना समोर आल्या आहेत. नुकताच गिट्टीखदान पोलीस स्टेशन अंतर्गत अज्ञात कार चालकाने दोन महिलांना चिरडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता रघूजी नगर पोलीस क्वार्टर परिसरातही भीषण अपघाताची एक घटना घडली. या अपघातात भरधाव मोटारसायकलने दुचाकीवर स्वार दोन महिलांना जोरदार धडक दिल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
तर घटनेनंतर अज्ञात मोटारसायकल स्वार आरोपी पसार झाल्याची माहिती आहे. व्हायरल व्हिडिओनुसार या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून दुसरी महिला मदतीसाठी आरडाओरडा करतांना दिसत आहे. मात्र,हा व्हिडिओ दोन महिन्यापूर्वीचा असून पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली की नाही याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.