भंडारा : डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू; पालकांचा आरोप

भंडारा; Bharat Live News Media वृत्तसेवा : जिल्ह्यातील लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी (दि.२८) नवजात बाळाचा मृत्यू झाला. या बाळाचा मृत्यू परिचारिका व डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप बाळाचे वडील रविकांत फाये यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित डॉक्टर व परीचारिकांवर कायदेशीर कारवाई करत न्याय देण्याची मागणी सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सकांकडे करण्यात आली आहे.
तक्रारदार रविकांत फाये यांच्या गर्भवती पत्नीचे व बाळाचे शेवटपर्यंत सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते. प्रसुती कळा आल्यानंतर रुग्णालयात दाखल केले. रात्रीच्या सुमारास प्रसूतीगृहात दाखल महिलेला भंडारा येथे हलविण्यास सांगितले. यावेळी डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप पालकाने केला आहे.
हेही वाचा :
Prajwal Revanna : प्रज्वल रेवण्णा अश्लील व्हिडिओ प्रकरणी एसआयटीकडून दोघांना अटक
बिहारमध्ये उष्णतेची लाट; १८ विद्यार्थिनी झाल्या बेशुद्ध, रुग्णालयात केले दाखल
Nashik Niphad News : निफाड येथे शेततळ्यात पडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
