अपघातग्रस्त पोर्शे गाडीची नोंदणी रद्द; पुणे आरटीओचे आदेश

पुणे: Bharat Live News Media वृत्तसेवा: कल्याणीनगर अपघातातील पोर्शे गाडीची (Pune Porsche Accident) तपासणी केल्यानंतर मोटार वाहन कायद्यातील कलम 199 नुसार, त्या गाडीची रजिस्ट्रेशन (तात्पुरती नोंदणी) रद्द करण्याचे आदेश पुणे आरटीओ कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. यामुळे या गाडीला आता येथून पुढे रस्त्यावर धावण्यास कायमची बंदी असणार आहे.
कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातात इंजिनिअर तरुण आणि अश्विनी यांना आपले जीव गमवावे लागले. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून या घटनेचा जोरदार तपास सुरू होता. त्यासोबतच प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकाकडून देखील अपघातग्रस्त वाहनाची वेळोवेळी तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी (दि.29) रोजी पुणे आरटीओकडून अपघातग्रस्त पोर्षे कारची नोंदणी रद्द करण्याचे आदेश काढण्यात आले आहे. मात्र ही कारवाई बेंगलोर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून केली जाणार आहे. कारण या गाडीला तात्पुरता वाहन परवाना म्हणजेच नोंदणी परवाना बंगलोर आरटीओकडून देण्यात आला होता. त्यामुळे ही नोंदणी देखील बेंगलोर आरटीओ कडूनच रद्द केली जाणार आहे.
मोटार वाहन कायदा 199 ची उल्लंघन झाल्याने संबंधित अपघात ग्रस्त वाहनाची नोंदणी 12 महिन्यांकरता का रद्द करण्यात येऊ नये, अशी नोटीस अपघात ग्रस्त वाहन मालकाला जारी करण्यात आली होती. विहित मुदतीत उत्तर न आल्याने त्या वाहनाची तात्पुरती नोंदणी मोटर वाहन कायदा कलम 55 (5) नुसार रद्द करण्याचे आदेश जारी केले आहेत. व मूळ जारी करणारे प्राधिकारी आरटीओ बेंगलोर सेंटर यांना पुढील कार्यवाहीसाठी कळविण्यात आले आहे.
संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
हेही वाचा
pune porsche accident : रक्त बदलण्याचा बिल्डरला डॉ. तावरेचाच सल्ला!
pune porsche accident : रक्ताच्या नमुन्यांमध्ये अल्कोहोल आढळलेच नाही
pune porsche accident : बिल्डर विशाल अगरवालचा पाय खोलात.!
