सूर्य आग ओकतोय! दिल्‍ली @५१.४ अंश सेल्सिअस, रेकॉर्ड ब्रेक तापमान

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्लीच्या मुंगेशपूर हवामान केंद्रात ५१.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. शहराच्या इतिहासातील आतापर्यंतचे ही सर्वोच्‍च तापमान नोंद आहे, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. देशात पुढील २ दिवस तरी उष्ण वातावरण कायम राहण्याची शक्यता असल्‍याचे मंगळवार २८ मे रोजी भारतीय हवामान विभागाने स्पष्‍ट केले होते. Delhi’s Mungeshpur records the highest temperature of …

सूर्य आग ओकतोय! दिल्‍ली @५१.४ अंश सेल्सिअस, रेकॉर्ड ब्रेक तापमान

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : दिल्लीच्या मुंगेशपूर हवामान केंद्रात ५१.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. शहराच्या इतिहासातील आतापर्यंतचे ही सर्वोच्‍च तापमान नोंद आहे, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.
देशात पुढील २ दिवस तरी उष्ण वातावरण कायम राहण्याची शक्यता असल्‍याचे मंगळवार २८ मे रोजी भारतीय हवामान विभागाने स्पष्‍ट केले होते.

Delhi’s Mungeshpur records the highest temperature of 51.4°C: IMD pic.twitter.com/i1ESWgiEep
— ANI (@ANI) May 29, 2024

मान्सून केरळमध्ये दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल
वायव्य आणि मध्य भारतातील प्रचलित उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट 30 मे 2024 पासून हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. पुढे केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सुरू होण्यासाठी आणि पुढील 3-4 दिवसांत ईशान्येकडील राज्यांच्या काही भागांत पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे देखील हवामान विभागाने म्हटले आहे.
अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमान घटणार; डॉ. नरेश कुमार
उत्तर भारतातील उष्णतेच्या लाटेबाबत, वरिष्ठ IMD शास्त्रज्ञ डॉ. नरेश कुमार म्हणतात, “राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली-एनसीआर, पश्चिम उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट राहील. त्यानंतर, उष्णतेची लाट थोडी कमी होईल. अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात घट होणार आहे आणि येत्या 3-4 दिवसांत केरळमध्ये उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता आहे.