मान्सून पुढील २४ तासांत केरळमध्ये पोहोचणार- IMD

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढील २४ तासांत मान्सून केरळमध्ये पोहोचण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. तसेच पुढील २४ तासांत ईशान्येकडील राज्यांच्या काही भागांतही मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनची पहिली शाखा मंगळवारी (दि. २८) दक्षिण अरबी समुद्रात दाखल झाली होती. दुसरी शाखा बंगालच्या उपसागरातून पश्चिम …

मान्सून पुढील २४ तासांत केरळमध्ये पोहोचणार- IMD

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पुढील २४ तासांत मान्सून केरळमध्ये पोहोचण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. तसेच पुढील २४ तासांत ईशान्येकडील राज्यांच्या काही भागांतही मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनची पहिली शाखा मंगळवारी (दि. २८) दक्षिण अरबी समुद्रात दाखल झाली होती. दुसरी शाखा बंगालच्या उपसागरातून पश्चिम बंगालसह पूर्वोत्तर राज्यांत आगामी ७२ तासांत येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, पंजाब, हरियाणा-चंदीगढ-दिल्ली, राजस्थानचा अनेक भाग, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचा पूर्व भाग तसेच बिहार, झारखंड, ओडिशामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.
राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता
दरम्यान, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (४०-५० किमी प्रतितास वेग) वाहण्याची शक्यता आहे. तसेच हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने बुधवारी दिली.
दरम्यान, आज ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा येथे ४५.२ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. तर सर्वात कमी किमान तापमान जेऊर येथे २२ अंश सेल्सियस होते.

.The conditions continue to become favourable for Monsoon onset over Kerala during next 24 hours and advance of monsoon over some parts of Northeastern States during the same period. pic.twitter.com/JGiHNY5tbM
— India Meteorological Department (@Indiametdept) May 29, 2024

Heatwave to severe heatwave conditions very likely in most parts of Punjab, Haryana-Chandigarh-Delhi, many parts of Rajasthan, Uttar Pradesh, East Madhya Pradesh, few parts of West Madhya Pradesh isolated pockets of Bihar, Jharkhand, Odisha and heatwave conditions very likely pic.twitter.com/9N6Hr3z8dZ
— India Meteorological Department (@Indiametdept) May 29, 2024

हे ही वाचा :

जुलैपर्यंत ‘ला निना’! ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अधिक पाऊस- IMD
सावधान! विदर्भात उष्णतेचा कहर; ‘या’ भागात हलक्या पावसाचा अंदाज

 

Go to Source