
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : कोणत्याही देशाचा आपल्या शेजारच्या देशांबरोबर असलेला संघर्ष हा कायम राहतोच. यातूनच दोन देशांमधील युद्ध असो की सातत्याने सीमेवर असणारा तणाव हा अभिवाज्य भागच बनतो. दोन्ही देश नेहमी एकमेकांवर कुरघोडीच्या प्रयत्नात असतात. मात्र एका देशाने शेजारच्या देशात चक्क कचरा टाकला आहे, हे वाचून तुमच्या भुवया उंचावतील;पण हे वास्तव आहे. उत्तर कोरियाने मोठ्या फुगांच्या सहाय्याने कचर्याची पोतीच दक्षिण कोरियात धाडल्याचे वृत्त दक्षिण ग्योंगसांगचा आग्नेय प्रांतातील ‘योनहाप न्यूज’ने दिले आहे.
दक्षिण कोरियाने कचर्यांच्या फुगे असणारे फाेटाे सार्वजनिक केले आहेत. प्लास्टिकच्या पिशव्या वाहून नेणारे ठे फुगे आणि काही खराब झालेल्या वस्तू, कागदाचे पत्रे, प्लास्टिकचे तुकडे फुटपाथ आणि रस्त्यांवर विखुरल्याचे या फाेटाेत दिसते. दक्षिण काेरियातील अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पडलेल्या फुग्यांमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, बॅटरी, बूटांचे भाग आणि अगदी खत यांसह विविध प्रकारचा कचरा वाहून गेल्याचे दिसते.
सरकारी एजन्सी सध्या या फुग्यांचे विश्लेषण करत आहेत. याध्ये घाण आणि कचरा समाविष्ट आहे. उत्तर कोरियाच्या कृती स्पष्टपणे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करते. आमच्या नागरिकांच्या सुरक्षेला गंभीरपणे धोक्यात आणत आहेत, असेही दक्षिण कोरियाने म्हटलं आहे. कचर्यांच्या फुग्यांमुळे उद्भवणारी सर्व जबाबदारी संपूर्णपणे उत्तर कोरियाची आहे. त्यांनी तत्काळ अमानवीय कृत्य थांबवावे, असा इशाराही दक्षिण काेरियाने दिला आहे.
N. Korea appears to be struggling to secure parts for spy satellite: presidential office https://t.co/bMzRCves5Q
— Yonhap News Agency (@YonhapNews) May 29, 2024
दक्षिण कोरियाच्या उत्तरेकडील ग्योन्गी आणि गँगवॉन प्रांतातील लोकांना त्यांच्या स्थानिक सरकारांकडून “अज्ञात वस्तू” बद्दल सावधगिरीचा इशारा देण्यात आला. येथे नागरिकांना घराबाहेर न जाण्याचा सल्ला देण्यात आला. अशा प्रकारच्या फुग्यांमुळे घरे, विमानतळ आणि रस्ते यांना हानी पोहोचण्याची शक्यता असल्याचे वृत्त ‘सीएएन’ने उत्तर कोरियाचे राज्य मीडिया केसीएनएचा हवालाव्दारे दिला आहे.
हेही वाचा :
उत्तर कोरियाचे रॉकेट झाले फुस्स…; जपान म्हणाले ‘हे’ जगासाठी धोकादायक
उत्तर कोरियाचे रॉकेट झाले फुस्स…; जपान म्हणाले ‘हे’ जगासाठी धोकादायक
