मतमोजणीच्या फेर्‍या, टेबलसंख्या निश्चित : या असेल ठिकाणी मतमोजणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील पुणे, मावळ, बारामती आणि शिरूर या चारही लोकसभा मतदारसंघांतील निवडणुकीच्या दि. 4 जूनला होत असलेल्या मतमोजणीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मतमोजणीच्या टेबलांची संख्या आणि मतमोजणीच्या फेर्‍या निश्चित झाल्या आहेत. पुण्यात वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या सर्वाधिक 21, तर बारामतीमध्ये सर्वाधिक 24 फेर्‍या खडकवासला आणि भोर मतदारसंघात होणार …

मतमोजणीच्या फेर्‍या, टेबलसंख्या निश्चित : या असेल ठिकाणी मतमोजणी

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील पुणे, मावळ, बारामती आणि शिरूर या चारही लोकसभा मतदारसंघांतील निवडणुकीच्या दि. 4 जूनला होत असलेल्या मतमोजणीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मतमोजणीच्या टेबलांची संख्या आणि मतमोजणीच्या फेर्‍या निश्चित झाल्या आहेत. पुण्यात वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या सर्वाधिक 21, तर बारामतीमध्ये सर्वाधिक 24 फेर्‍या खडकवासला आणि भोर मतदारसंघात होणार आहे. त्यापाठोपाठ शिरूर लोकसभा मतदारसंघात शिरूरमध्ये 27, तर हडपसरमध्ये 26 फेर्‍या होणार आहेत.
पुणे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामात होणार आहे. या मतमोजणीच्या जास्तीत जास्त 21 फेर्‍या होणार आहेत. वडगाव शेरी विधानसभेसाठी 22 टेबलांची व्यवस्था असून शिवाजीनगर 14, कोथरूड 20, पर्वती 18, पुणे कॅन्टोन्मेंट 14 आणि कसबा पेठ 14, याशिवाय पोस्टल आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मतमोजणीसाठी दहा टेबलांची व्यवस्था असेल. शिरूर मतदारसंघाच्या जास्तीत जास्त 27 फेर्‍या होतील. ही मतमोजणी रांजणगाव औद्योगिक क्षेत्रातील राज्य वखार महामंडळाच्या गोदामामध्ये होईल. यामध्ये जुन्नरसाठी 14 टेबलांची व्यवस्था असून, आंबेगाव 14, खेड आळंदी 16, शिरूर 16, भोसरी 20, हडपसर 20 आणि पोस्टल तसेच ज्येष्ठ मतदारांच्या मतमोजणीसाठी 12 टेबलांची व्यवस्था केली आहे.
बारामती मतदारसंघासाठी जास्तीत जास्त 24 फेर्‍या होणार आहेत. ही मतमोजणी देखील कोरेगाव पार्क येथील खाद्य महामंडळाच्या गोदामात होणार आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय दौंडसाठी 14, इंदापूर 16, बारामती 18, पुरंदर 20, भोर 24 आणि खडकवासला 22, तर पोस्टल आणि ज्येष्ठ मतदारांच्या मतमोजणीसाठी दहा टेबलांची व्यवस्था केलेली आहे. मावळ मतदारसंघाची मतमोजणी श्री शिवछत्रपती क्रीडासंकुल बालेवाडी येथे होणार आहे. या मतदारसंघात मतमोजणीच्या जास्तीत जास्त 25 फेर्‍या होणार आहेत. मतमोजणीसाठी पनवेल 24, कर्जत 14, उरण 14, मावळ 16, चिंचवड 24 आणि पिंपरीमध्ये 16 टेबलांची व्यवस्था केलेली आहे. पोस्टल आणि ज्येष्ठ मतदारांच्या मतमोजणीसाठी आठ टेबलांची व्यवस्था असेल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
या ठिकाणी मतमोजणी

 पुणे लोकसभा – भारतीय खाद्य महामंडळाचे गोदाम, कोरेगाव पार्क, पुणे
 बारामती लोकसभा – भारतीय खाद्य महामंडळाचे गोदाम, कोरेगाव पार्क, पुणे
 शिरूर लोकसभा – राज्य वखार महामंडळाचे गोदाम, एमआयडीसी रांजणगाव, ता. शिरूर
मावळ लोकसभा – शिवछत्रपती क्रीडासंकुल, बालेवाडी वेट लिफ्टिंग हॉल, पुणे

हेही वाचा

धक्कादायक! गौण खनिज चोरी नियंत्रण पथकच तडजोडीत मग्न
Pune Crime | अल्पवयीनच्या खुनाचा प्रयत्न करणार्‍या तिघांना अटक
लोणावळ्यातील वीजपुरवठा विस्कळीत