अखेर राज्यात हजारांहून अधिक तलाठ्यांची नियुक्ती

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील आदिवासी बहुल अर्थात पेसा क्षेत्रातील तलाठी पदांची नियुक्ती आचारसंहितेत अडकली आहे. मात्र, उर्वरित 23 जिल्ह्यांमध्ये सुमारे एक हजारांहून अधिक तलाठ्यांची नियुक्ती झाली आहे. परीक्षा दिल्यानंतर तब्बल दहा महिन्यांनी या उमेदवारांना नियुक्ती मिळाली आहे. सर्वाधिक 144 तलाठ्यांची नियुक्ती रायगड जिल्ह्यात झाली आहे. राज्यात मागील वर्षी जून महिन्यात चार हजार 466 …

अखेर राज्यात हजारांहून अधिक तलाठ्यांची नियुक्ती

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्यातील आदिवासी बहुल अर्थात पेसा क्षेत्रातील तलाठी पदांची नियुक्ती आचारसंहितेत अडकली आहे. मात्र, उर्वरित 23 जिल्ह्यांमध्ये सुमारे एक हजारांहून अधिक तलाठ्यांची नियुक्ती झाली आहे. परीक्षा दिल्यानंतर तब्बल दहा महिन्यांनी या उमेदवारांना नियुक्ती मिळाली आहे. सर्वाधिक 144 तलाठ्यांची नियुक्ती रायगड जिल्ह्यात झाली आहे.
राज्यात मागील वर्षी जून महिन्यात चार हजार 466 जागांसाठी 10 लाख 41 हजार 713 एवढे अर्ज प्राप्त झाले होते. त्यांपैकी आठ लाख 64 हजार 960 उमेदवारांनी परीक्षा दिली. मात्र, पेसा क्षेत्रातील अर्थात आदिवासी बहुल क्षेत्रातील जिल्ह्यांमधील पदभरतीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने राज्यातील 13 जिल्ह्यांमधील पदांबाबत निकाल राखून ठेवण्यात आला. पहिल्यांदा जाहीर करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीनंतर 23 जिल्ह्यांमध्ये यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रश्नपत्रिकेतील त्रुटी दूर केल्यानंतर दुसर्‍यांदा गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यात पहिल्या गुणवत्ता यादीतील बहुतांश उमेदवार दुसर्‍या गुणवत्ता यादीतही होते.
दुसर्‍यांदा गुणवत्ता यादी जाहीर करताना पेसा क्षेत्रातील 13 जिल्ह्यांमधील पेसा गावे वगळून अन्य पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा करण्यात आला. त्यामुळे या 13 जिल्ह्यांमध्ये जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीला काहीसा विलंब झाला. त्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली. यादरम्यान पडताळणी पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराकडून पसंतीक्रमही घेण्यात आला. मात्र, नियुक्ती देताना आचारसंहितेच्या नियमांची अंमलबजावणी कशी करावी, असा पेच जिल्हाधिकार्‍यांपुढे निर्माण झाला होता. त्यामुळे या 13 जिल्ह्यांमधील तलाठ्यांची नियुक्ती अद्याप होऊ शकलेली नाही.
मात्र, राज्यातील अन्य 23 जिल्ह्यांमधील दोन हजार 479 निवड झालेल्या उमेदवारांपैकी एक हजार 449 उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली होती. त्यातील एक हजार 44 उमेदवारांना तलाठी पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. अन्य उमेदवारांची त्यात सर्वाधिक 141 तलाठी रायगड जिल्ह्यामधील आहेत. त्याखालोखाल 113 उमेदवार सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत, तर अमरावती, यवतमाळ, पालघर, गडचिरोली, पुणे, नगर, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, चंद्रपूर, नांदेड व ठाणे या जिल्ह्यांमधील एक हजार 703 उमेदवारांची नियुक्ती रखडली आहे.
हेही वाचा

Pune Crime | अल्पवयीनच्या खुनाचा प्रयत्न करणार्‍या तिघांना अटक
बेकायदेशीर सावकारी करणार्‍यांवर कारवाई करा: भाजपची मागणी
केजरीवालांना धक्‍का, २ जूनला कारागृहासमाेर शरणागती पत्‍करावी लागणार