Pune Crime | अल्पवयीनच्या खुनाचा प्रयत्न करणार्या तिघांना अटक
तळेगाव दाभाडे : Bharat Live News Media वृत्तसेवा : देह विक्रीसाठी नकार देणार्या अल्पवयीन मुलीचा गळा दाबून व चाकूने वार करत खून करण्याचा प्रयत्न करणार्या तिघांना शिरगाव पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवार (दि. 26) व सोमवार (दि. 27) या दोन दिवसांच्या कालावधीत मावळातील सोमाटणे परिसरात घडली.
याप्रकरणी 16 वर्षीय मुलीने शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी पवनकुमार अयोध्या प्रसाद (वय 23 रा. उत्तर प्रदेश) महिला आरोपी व दीपक गोवारी यादव (वय 21 रा. उत्तर प्रदेश) या तिघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक यांनी पिडीतेशी प्रेमसंबंध तयार केले. त्यानंतर पवनकुमार व महिला आरोपीने तिच्याकडे देहविक्रीची मागणी केली. या वेळी पीडितेने त्यांना नकार दिला. तिला मूळगावी सोडण्याचा बहाणा करून तिला दुचाकीवर घेऊन जाऊन महिला आरोपीच्या भाड्याच्या खोलीत तिला ठेवले. त्यानंतर सोमवारी सायंकाळी अंधारात घेऊन जाऊन तिच्या मानेच्या पाठीमागील बाजूला चाकूने वार केला. तसेच, गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेने आपली सुटका करून घेत थेट पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, शिरगाव पोलिस तपास करत आहेत.
हेही वाचा
बेकायदेशीर सावकारी करणार्यांवर कारवाई करा: भाजपची मागणी
डॉ. पवार यांचे निलंबन रद्द करा : रिपाइंची मागणी; आंदोलनाचा इशारा
लोणावळ्यातील वीजपुरवठा विस्कळीत