बेकायदेशीर सावकारी करणार्‍यांवर कारवाई करा: भाजपची मागणी

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : शहरामधील रस्त्यांवर मध्यरात्रीनंतर नशेमध्ये फिरणार्‍यांवर आळा घालण्यासंदर्भात तसेच बेकायदेशीर सावकारी करून गरीब जनतेला वेठीस धरणार्‍यांवर कडक कारवाई करण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच, या संदर्भातील निवेदन लोणावळा शहर पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांना दिले आहे. या वेळी भाजपचे शहराध्यक्ष अरुण लाड, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दीपक कांबळे, संघटन मंत्री …

बेकायदेशीर सावकारी करणार्‍यांवर कारवाई करा: भाजपची मागणी

लोणावळा : Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरामधील रस्त्यांवर मध्यरात्रीनंतर नशेमध्ये फिरणार्‍यांवर आळा घालण्यासंदर्भात तसेच बेकायदेशीर सावकारी करून गरीब जनतेला वेठीस धरणार्‍यांवर कडक कारवाई करण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.
तसेच, या संदर्भातील निवेदन लोणावळा शहर पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांना दिले आहे. या वेळी भाजपचे शहराध्यक्ष अरुण लाड, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दीपक कांबळे, संघटन मंत्री अर्जून पाठारे, सरचिटणीस बाबू संपत आणि युवक अध्यक्ष प्रथमेश पाळेकर आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, की रात्री-अपरात्री अनेक जण दारूच्या नशेमध्ये भरधाव वेगाने दुचाकी व कार चालविताना आढळून येत आहेत. अशामुळे भविष्यात अनुचित प्रकार घडून गुन्हेगारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे अशा प्रकाराला वेळीच
आळा घालावा.
सावकारांचा सर्वसामान्यांना त्रास
निवेदनात म्हटले आहे, की शहरामधील अनेक गोरगरिबांना वीस टक्के एवढ्या प्रचंड व्याज दराने काही सावकार पैसे देतात. तसेच, त्यांच्याकडून चेक डिपॉझिट म्हणून घेतात व तो चेक बाउन्स करून तुमच्यावर पोलिस केस करू अशी धमकी देऊन चढ्या दराने व्याजाचे पैसे वसूल करतात. अशा अनेक तक्रारी आढळून आल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या चेक बाउन्सची तक्रार आल्यास त्वरित समोरच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल न करता प्रकरणाची संपूर्ण खातरजमा करून नंतरच योग्य त्या व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी शहर भाजपच्या वतीने करण्यात
आली आहे.
हेही वाचा

लोणावळ्यातील वीजपुरवठा विस्कळीत
भाजपला किती जागा मिळतील? योगी आदित्यनाथांचा मोठा दावा
आचारसंहितेची एकसमान अंमलबजावणी आवश्यक : श्रीकांत देशपांडे