डॉ. पवार यांचे निलंबन रद्द करा : रिपाइंची मागणी; आंदोलनाचा इशारा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्या निलंबन प्रकरणात आता रिपाइंने (आठवले गट) उडी घेतली असून, डॉ. पवार यांचे निलंबन रद्द करा; अन्यथा तीव्र आंदोलन करू, अशा इशारा रिपाइंच्या पदाधिकार्‍यांनी दिला आहे. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, संजय सोनवणे, बाळासाहेब जानराव, शैलेंद्र चव्हाण आदी पदाधिकार्‍यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ …

डॉ. पवार यांचे निलंबन रद्द करा : रिपाइंची मागणी; आंदोलनाचा इशारा

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्या निलंबन प्रकरणात आता रिपाइंने (आठवले गट) उडी घेतली असून, डॉ. पवार यांचे निलंबन रद्द करा; अन्यथा तीव्र आंदोलन करू, अशा इशारा रिपाइंच्या पदाधिकार्‍यांनी दिला आहे.
माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, संजय सोनवणे, बाळासाहेब जानराव, शैलेंद्र चव्हाण आदी पदाधिकार्‍यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे. कोरोना काळात जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून ज्यांनी उत्तम काम केले; शिवाय गेल्या वर्षभरापासून ते पुणे महापालिकेत आरोग्य अधिकारी म्हणून काम करीत होते.
चांगल्या कामाबद्दल शासनाने त्यांचा सन्मानही केला आहे. मात्र, बेकायदेशीर काम करण्यास त्यांनी नकार दिल्याने आकसापोटी आणि जातीयवादी मानसिकतेतून डॉ. पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आरोग्य विभागाने याकडे लक्ष देऊन राज्याची मोडकळीस आलेली सार्वजनिक आरोग्यव्यवस्था सक्षम करणे गरजेचे आहे. मात्र, आरोग्य विभाग खोटेनाटे आरोप करून मागासवर्गीय अधिकार्‍यांवर अन्याय करीत आहे, असा आरोप डॉ. धेंडे यांनी या वेळी केला.
डॉ. पवार यांच्या समर्थनार्थ बॅनर
डॉ. भगवान पवार यांचे निलंबन तत्काळ मागे घ्यावे, अशी मागणी करत युवक काँग्रेसच्या वतीने शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे यांनी आरोग्य खात्याचा निषेध करीत कारवाई मागे घेण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा

लोणावळ्यातील वीजपुरवठा विस्कळीत
आचारसंहितेची एकसमान अंमलबजावणी आवश्यक : श्रीकांत देशपांडे
केजरीवालांना धक्‍का, २ जूनला कारागृहासमाेर शरणागती पत्‍करावी लागणार