भाजपला किती जागा मिळतील? योगी आदित्यनाथांचा मोठा दावा
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : संविधानाचा गळा घोटण्याचे काम काँग्रेसने आणीबाणीच्या माध्यमातून केले आहे, असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते योगी आदित्यनाथ एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केला.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, “संविधानाचा गळा घोटण्याचे काम काँग्रेसने आणीबाणीच्या माध्यमातून केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात जाऊन, तत्कालीन काँग्रेस सरकारने बळजबरीने घटनेत कलम ३७० समाविष्ट केले. हा देश डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेवर चालेल. हा देश पर्सनल लॉ किंवा शरिया कायद्यावर चालणार नाही.
पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, “आज ‘४०० पार’ हा सामान्य माणसाचा मंत्र बनला आहे. सगळीकडे तुम्हाला ‘फिर एक बार मोदी सरकार- अबकी बार ४०० पार’ हेच ऐकू येईल. हे अचानक घडलेले नाही. तर गेल्या १० वर्षात देशातील प्रत्येक क्षेत्रात झालेल्या बदलांमुळे ४ जूनला भाजप-एनडीए ‘४०० पार’चे लक्ष्य पूर्ण करेल.”
#WATCH | Uttar Pradesh CM & BJP leader Yogi Adityanath to ANI, he says, “…On June 4, BJP-NDA will meet the target of ‘400 paar…The work of strangling the Constitution was done by Congress through Emergency…This country will run on the Constitution made by Baba Saheb Bhimrao… pic.twitter.com/XiZSiwmW6t
— ANI (@ANI) May 29, 2024
हेही वाचा
१९९९ चा लाहोर करार काय होता? ज्यावर नवाझ शरीफ यांनी २५ वर्षांनंतर चूक केली कबूल
Pune Porsche Car Accident: पुणे पोर्शे अपघात दडपण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न, सीबीआय चौकशी करा: पटोले
Prajwal Revanna : प्रज्वल रेवण्णाच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणी एसआयटीकडून दोघांना अटक
Stock Market Updates | सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला, ‘या’ हेवीवेट शेअर्संना फटका