प्रज्वल रेवण्णाच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणी एसआयटीकडून दोघांना अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : अत्याचार, लैंगिक छळ प्रकरणात खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध विशेष तपास दलाकडून (एसआयटी) तपास सुरू आहे. या प्रकरणी एसआयटीने आज (दि. २९) दोघा संशयित आरोपींना अटक केली आहे. SIT arrests two accused in connection with Prajwal Revanna’s obscene video case Read @ANI Story | https://t.co/Y7wXXDEMhA#SIT #PrajwalRevanna #ObsceneVideoCase #Police pic.twitter.com/kq1HUlznAX — ANI Digital …

प्रज्वल रेवण्णाच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणी एसआयटीकडून दोघांना अटक

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अत्याचार, लैंगिक छळ प्रकरणात खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध विशेष तपास दलाकडून (एसआयटी) तपास सुरू आहे. या प्रकरणी एसआयटीने आज (दि. २९) दोघा संशयित आरोपींना अटक केली आहे.

SIT arrests two accused in connection with Prajwal Revanna’s obscene video case
Read @ANI Story | https://t.co/Y7wXXDEMhA#SIT #PrajwalRevanna #ObsceneVideoCase #Police pic.twitter.com/kq1HUlznAX
— ANI Digital (@ani_digital) May 29, 2024

प्रज्वल रेवण्णा ३१ मे रोजी SIT समोर हजर होणार
प्रज्वल यांनी सोमवारी (दि. २७) व्हिडीओ पाठवून ३१ मे रोजी एसआयटीसमोर हजर होणार असल्याचे कळवले आहे. हा व्हिडीओ त्यांनी कोठून पाठवला. ते कोणत्या देशात आहेत? याचा तपास एसआयटीकडून सुरु झाला आहे. प्रज्वल यांनी एसआयटीसमोर येऊन आपले मत मांडण्याचे व्हिडीओमध्ये सांगितले आहे. संपूर्ण राज्यातील जनतेची, आपल्या कुटुंबीयांची माफी त्यांनी मागितली आहे. पण, हा व्हिडी ओ त्यांनी कोठून पाठवला याचा पत्ता लागलेला नाही, त्यांच्यावर २७ एप्रिल रोजी लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर ते परदेशात गेले होते. ते जर्मनीत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. भारतात परतण्यासाठी त्यांनी पाचवेळा विमानाचे तिकीट आरक्षित केले होते. पण, अटकेच्या भीतीमुळे त्यांनी पाचहीवेळा तिकीट रद्द केले होते.
ताब्यात घेण्याची तयारी सुरू
त्यानंतर १९६ देशांना प्रज्वल यांच्याबाबत माहिती देण्यात आली होती. त्यांना ब्लू कॉर्नर नोटीस बजावली होती. तरीही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी कर्नाटक सरकारने केंद्राकडे केली होती. केंद्राने प्रज्वल यांना नोटीस बजावून विदेशी जाण्यामागील कारण विचारले. त्यानंतर दोन दिवसांनी प्रज्वल यांनी व्हिडीओ पाठवला. शुक्रवारी ते कर्नाटकात परतणार असल्याने त्यांना ताब्यात घेण्याची तयारी एसआयटी करत आहे. ते नेमके कुठे येणार? याबाबतची माहिती एसआयटी घेत आहे. ते परतल्यानंतर त्यांना तातडीने ताब्यात घेऊन चौकशी केली जाणार आहे.
हेही वाचा : 

कर्नाटकात प्रज्वल पेनड्राईव्हचा ‘रानबाजार’
सेक्स स्कँडल! प्रज्वलचे कारनामे उघड, ‘त्या’ महिलांनी गाव सोडले

Go to Source