सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला, ‘या’ हेवीवेट शेअर्संना फटका

पुढारी ऑनलाई डेस्क : जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांदरम्यान भारतीय शेअर बाजारात बुधवारी (दि.२९) सलग चौथ्या सत्रात घसरण झाली. सर्वच क्षेत्रांत विक्री दिसून येत आहे. सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरून ७४,७०० च्या खाली आला. तर निफ्टी १५० अंकांनी घसरून २२,७५० वर व्यवहार करत आहे. ‘हे’ हेवीवेट शेअर्स घसरले सेन्सेक्सवर आयसीआयसीआय बँक, एम अँड एम, ॲक्सिस …
सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला, ‘या’ हेवीवेट शेअर्संना फटका

Bharat Live News Media ऑनलाई डेस्क : जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांदरम्यान भारतीय शेअर बाजारात बुधवारी (दि.२९) सलग चौथ्या सत्रात घसरण झाली. सर्वच क्षेत्रांत विक्री दिसून येत आहे. सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरून ७४,७०० च्या खाली आला. तर निफ्टी १५० अंकांनी घसरून २२,७५० वर व्यवहार करत आहे.
‘हे’ हेवीवेट शेअर्स घसरले
सेन्सेक्सवर आयसीआयसीआय बँक, एम अँड एम, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा हे शेअर्स सर्वाधिक घसरले आहेत. तर पॉवर ग्रिड, नेस्ले इंडिया, सन फार्मा हे शेअर्स वाढले आहेत.
सेन्सेक्सवरील शेअर्सची स्थिती (सकाळी १०.४७ वाजता)
एनएसई निफ्टीवर एचडीएफसी लाईफ, एसबीआय लाईफ, आयसीआयसीआय बँक, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. तर पॉवर ग्रिड, हिंदाल्को, नेस्ले इंडिया हे शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत. क्षेत्रीय पातळीवर निफ्टी फायनान्सियल, निफ्टी ऑटो घसरले आहेत.
Paytm शेअर्सला अप्पर सर्किट
दरम्यान, पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्सच्या शेअर्सला आज ५ टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्समधील हिस्सेदारी विकत घेण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. या पाश्वभूमीवर पेटीएमचे शेअर्सला अप्पर सर्किट लागले.
जागतिक बाजार
गुंतवणूकदारांचे लक्ष या आठवड्यात जाहीर होणाऱ्या अमेरिकेतील महागाईच्या आकडेवारीकडे लागले आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. दरम्यान, आशियाई बाजारात आज संमिश्र वातावरण दिसून येत आहे. हाँगकाँगचा हँगसेंग वाढला आहे. तर जपानचा निक्केई निर्देशांक घसरला आहे.
हे ही वाचा :

जाणून घ्या ‘नवीन करप्रणाली’तील कर बचतीचे पर्याय
वेध शेअर बाजाराचा : सरकारला डिव्हिडंड; गुंतवणूकदार मालामाल!