Blood sample manipulation case : चौकशी समितीचा बिर्याणीवर ताव!
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : ससूनमध्ये चौकशी समिती दाखल झाल्यावर एकीकडे तणावपूर्ण वातावरण होते, तर दुसरीकडे सदस्यांनी पुण्यातील कॅम्प परिसरातील प्रसिद्ध बिर्याणीवर ताव मारल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण विभागाने स्थापन केलेल्या चौकशी समितीतील सदस्य मंगळवारी सकाळी 11.30 वाजता ससून रुग्णालयात दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी झाल्यानंतर प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात झाली.
चौकशी दिवसभर चालणार असल्याने सदस्यांनी दुपारी जेवणाच्या सुट्टीसाठी ब्रेक घेतला. त्यावेळी त्यांच्यासाठी खास बिर्याणी ऑर्डर करण्यात आली. बिर्याणीची मेजवानी अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्या दालनात सुरू असताना बाहेर चौकशीसाठी बोलाविलेल्या कर्मचारी, परिचारिकांना ताटकळत बसविले होते, अशी माहिती मिळाली.
हेही वाचा
pune porsche accident : अगरवाल पिता-पुत्राचा तपासाला असहकार
Nashik Water Issue | सिडको परिसरात पाणीबाणी
आयटीआय प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून..!