आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल. मेष: मागील काही काळापासून कुटुंबात सुरू असलेले गैरसमज आज तुमच्या संयमातून दूर होतील, असे श्रीगणेश सांगतात. घराच्या नूतनीकरणाचे …

आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

चिराग दारूवाला :

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात

चिराग दारूवाला :

. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष: मागील काही काळापासून कुटुंबात सुरू असलेले गैरसमज आज तुमच्या संयमातून दूर होतील, असे श्रीगणेश सांगतात. घराच्या नूतनीकरणाचे काम संदर्भात विचार कराल. जवळच्या व्यक्तीसोबत वाद होऊ शकतो. कठोर आणि अपमानास्पद भाषा वापरणे टाळा. इतरांवर जास्त विश्वास ठेवणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. सध्या व्यापारात लाभाची आशा नाही. तुमच्या जोडीदाराशी सकारात्मक आणि सहकार्याने वागा. आरोग्य चांगले राहील.
वृषभ: आज आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबातील ज्‍येष्‍ठांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक ठरेल, असे श्रीगणेश सांगतात. मुलांकडून मिळणारी चांगली बातमी तणाव दूर करेल. आळसामुळे तुमची काही कामे खोळंबू शकतात. जवळच्या मित्राशी मतभेद होऊ शकतात. कौटुंबिक जबाबदार्‍यांमुळे कामाच्या ठिकाणी जास्त वेळ घालवू शकणार नाही. घरातील वातावरण प्रसन्न राहील.
मिथुन : श्रीगणेश म्हणतात की, तुमची क्षमता आणि प्रतिभेच्‍या जोरावर अनुकूल परिस्थिती निर्माण कराल. तुमच्यातील प्रतिभेला चालना मिळेल. कुटुंबासह समाजात तुमचा सन्मान वाढेल. तुमच्या अहंकारी स्‍वभावामुळे चुका होतील. काहींच्या मनात गैरसमज निर्माण होऊ शकतात. स्‍वक्षमतेवर विश्वास ठेवा. घरातील सुखसोयींशी संबंधित खरेदीचा कार्यक्रम होईल. थंड पदार्थांचे सेवन टाळा.
कर्क : आज दुपारी लाभदायक परिस्थिती निर्माण होत असल्याचे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील काही ज्येष्ठ व्यक्तीकडून तुम्हाला काही फायदा होणार आहे. घरातील मोठ्यांचा आदर करा. खर्च वाढेल त्‍याचबरोबर उत्पन्नाचे साधनही वाढेल. प्रेमसंबंध सुधारतील. आरोग्‍य चांगले राहील.
सिंह : अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्‍यामुळे तुमचे लक्ष तुमच्या कामावर ठेवा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. वारशाने मिळालेल्या मालमत्तेशी संबंधित कामेही पूर्ण होऊ शकतात. अस्वस्थतेमुळे थोडा तणाव जाणवेल ज्यामुळे तुमच्या कामाच्या क्षमतेवर परिणाम होईल. नोकरीच्या ठिकाणी नोकरदाराशी मतभेद होऊ शकतात. कोणत्याही कामात जोडीदाराचा सल्ला घेणे तुमच्यासाठी चांगले राहील.
कन्या : श्रीगणेश म्‍हणतात की, आज आपण भावांसोबत महत्त्वाच्या विषयावर संवाद साधाल. भविष्यातील काही योजनाही आज पूर्ण होतील. विचारांवर नियंत्रण ठेवा. तुमच्या सन्मानाबाबत कोणतीही नकारात्मक स्थिती राहणार नाही. व्यवहारात प्रत्येक कामाच्या बिलाचा व्यवहार करा. पती-पत्नीचे नाते मधूर होईल. तणावामुळे आत्मसन्मान कमी होऊ शकतो.
तूळ : आज कोणतेही काम करण्यापूर्वी नियोजन करुनच सुरुवात करा. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीची भेट तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नातेवाईकाच्या हस्तक्षेपामुळे कुटुंबात काही तणाव निर्माण होऊ शकतो. या टप्प्यावर तुम्ही इतर लोक काय म्हणत आहेत याकडे लक्ष देणार नाही. सरकारी कर्मचाऱ्यांना आज नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवन आनंददायी राहिल.
वृश्चिक : आज भावनेच्‍या आहारी जावून कोणताही निर्णय घेवू नका. विद्यार्थ्यांना त्यांचा प्रकल्प पूर्ण करण्याची संधीही मिळेल. आज काही नकारात्मक गोष्टी बोलल्याने वाद होऊ शकतात. मुलांशी सहकार्य करा. भागीदारी संबंधित व्यवसायातील सर्व निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील, असे श्रीगणेश सांगतात. तुमच्या पार्टनरला तुम्हाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट सांगा. रक्तदाबाचा त्रास असणार्‍यांनी काळजी घ्‍यावी.
धनु : श्रीगणेश म्‍हणतात की, नातेवाईकांशी वादात तुमचे निर्णायक सहकार्य राहिल. समाजात तुमचा सन्मान वाढेल. महत्त्‍वाच्‍या कागदपत्रांची काळजी घ्‍या. खर्चावर नियंत्रण ठेवा. कर्मचाऱ्यांचे नकारात्मक वागणे तुम्हाला त्रास देऊ शकते. तुमचा सततचा राग वैवाहिक जीवनात तणाव निर्माण करू शकतो. यकृताशी संबंधित काही अस्वस्थता जाणवेल.
मकर : श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही तुमचे घर बदलण्याचा विचार करत असाल तर त्याबद्दल गांभीर्याने बोला. मातृपक्षाच्‍या नातेवाईकांशी काही वाद होण्‍याची शक्‍यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायाच्या ठिकाणी कामे सुरळीत चालू राहतील. ॲसिडीटी आणि उष्णतेचा त्रास होण्‍याची शक्‍यता.
कुंभ : घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यात आजचा दिवस तुमचा महत्त्वाचा वाटा असेल असे गणेश सांगतात. मुलांशी संबंधित कोणतीही समस्या देखील आज सोडवली जाईल. खर्च अपेक्षेपेक्षा जास्त होईल. आर्थिक परिस्थितीवर अधिक लक्ष केंद्रित करा. यावेळी संयम ठेवा. नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना होती. याचा गांभीर्याने विचार करा. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. उष्णतेमुळे थकवा जाणवेल.
मीन : आज घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आणि सदस्यांचे सहकार्य तुमच्यासाठी सौभाग्यपूर्ण वातावरण निर्माण करेल, असे श्रीगणेश सांगतात. काहीवेळा अधिक साध्य करण्याच्‍या आणि कामाची घाई तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. मित्र आणि कुटुंबियांसोबत मनोरंजन आणि मित्रांच्या भेटीमुळे आनंद मिळेल. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवा.