पोलीसांच्या तपासाच्या धास्तीने पळून गेलेले प्रेमयुगूल झाले ठाण्यात हजर

पूर्णा, Bharat Live News Media वृत्तसेवा : मामाच्या घरी राहणाऱ्या एका अल्पवयीन बालीकेस पळवून नेलेल्या युवकाने पोलीसांच्या धास्तीने पोलिस ठाण्यात हजर केल्याची अशी घटना पूर्णा तालूक्यातील एका गावात घडली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पूर्णा तालूक्यातील मामाच्या घरी राहणारी अल्पवयीन बालीका आनंदनगर येथील कंप्यूटर सेंटर मध्ये एम एस सी आय टी कोर्सचे शिक्षण घेत होती. या अल्पवयीन बालीकेस ऋषिकेश नामदेव पवार (रा.शेखराजूर, ता पालम) याने फूस लावून पळवून नेले. या घटनेची माहीती घरात मिळताच तिच्या नातेवाईकांनी थेट पूर्णा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
पूर्णा पोलिस ठाण्यात आरोपी युवका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अल्पवयीन बालीकेस पळवून नेलेल्या युवक व पिडीत बालीकेचा कसून शोध सुरु केला. यात ऋषिकेश व बालीकेचाही मोबाईल बंद असल्याने तपासात अडचणी येत होत्या. पोलिसांचा तपास सुरू असताना ऋषिकेश त्याच्या बहिणीशी कोणत्यातरी नंबर वरुन संभाषण करत माहीती मिळाली. त्या आधारे त्याचे सिडीआर गंगाखेड परिसर लोकोशन त्यांना मिळाले.
पोलिस आपल्या मागावर असल्याच्या माहिती मिळताच सदर यूवकाने नातेवाईकांच्या मदतीने २८ मे रोजी पूर्णा पोलिस ठाण्यात हजर केले. या घटनेत पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनात सपोनि रेखा शहारे, कुरील यांनी तपासकामी महत्वाची भुमिका बजावली. दरम्यान,सदरील युवक आरोपी व पळवून नेलेल्या बालीकेस जेरबंद करण्यात आले असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
