स्वातंत्र्यवीर सावरकरांना लोकसभा अध्यक्षांसह खासदारांचे अभिवादन

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये लोकसभा अध्यक्षांसह खासदारांनी मंगळवारी आदरांजली वाहिली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, महासचिव पी.सी. मोदी यांच्यासह खासदार, माजी खासदार आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. या मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संविधान सभेच्या सेंट्रल हॉलमध्ये स्थापित केलेली …

स्वातंत्र्यवीर सावरकरांना लोकसभा अध्यक्षांसह खासदारांचे अभिवादन

नवी दिल्ली; Bharat Live News Media वृत्तसेवा : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये लोकसभा अध्यक्षांसह खासदारांनी मंगळवारी आदरांजली वाहिली.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, महासचिव पी.सी. मोदी यांच्यासह खासदार, माजी खासदार आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. या मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
संविधान सभेच्या सेंट्रल हॉलमध्ये स्थापित केलेली स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा चंद्रकला कुमार कदम यांनी रेखाटलेली आहे. २६ फेब्रुवारी २००३ रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते या प्रतिमेचे अधिकृत अनावरण करण्यात आले होते.