मोदींवर टीका करण्याआधी मल्लिकार्जुन खरगेंचा व्हिडिओ बघा! : बावनकुळेंची टीका

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये “मेरा नाम है मल्लिकार्जुन खरगे.. मैं ईश्वर का अवतार हूं…” असे खरगे म्हणत आहेत. यावरही शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी यावरही भ्रष्टलेख लिहावा, असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करीत असून तथ्यहीन गोष्टी पसरवत आहेत. त्यावर एक्स समाजमाध्यमावर पोस्ट शेअर करीत बावनकुळे म्हणाले आहे की, संजय राऊत…तुमचे नेते मल्लिकार्जुन खरगे बघा काय म्हणतात? पंतप्रधान मोदींवर टीका करण्याआधी मल्लिकार्जुन यांचा हा व्हिडिओ बघा! आणि ठरवा. मल्लिकार्जुन खरगे स्वतःला देवाचे अवतार म्हणू लागले. ‘मेरा नाम है मल्लिकार्जुन खरगे.. मैं ईश्वर का अवतार हूं…’ यांच्यावरही भ्रष्टलेख लिहा” असे आव्हान भाजपा प्रदेशाध्यक्षांनी दिले आहे.
