चंद्रपूर : ब्रम्हपुरी शहराचा पारा चढला; 47.2 उच्चांकी तापमानाची नोंद

चंद्रपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : आठवडाभरापासून पूर्व विदर्भातील तापमानाचा पारा चढत आहे. यवतमाळला मागे टाकत चंद्रपूर जिल्ह्यात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. आज मंगळवारी (दि.28) चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात 47.2 तापमानाची नोंद करण्यात आली. तर अमरावती, नागपूर व वर्धा 45 जिल्ह्याचे तापमान 45 अंशापार गेले आहे. उष्णतेमध्ये चंद्रपूरला एका दिवसाचा ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे.
आठवडाभरात प्रत्येक जिल्हे एकमेकांना मागे टाकीत जणू हॉट तापमानाची स्पर्धाच सुरू आहे, असे भासू लागले आहे. शुक्रवारी अकोल्याचा पारा 45 अंशापार गेल्यानतर रविवारी यवतमाळ जिल्हा होरपळला. अकोल्याला मागे टाकीत 46 अंशावर पारा चढला. आठवडाभरापासून महाराष्ट्रात पूर्व विदर्भ हॉट ठरत आहे. राज्यात पूर्व विदर्भातील सगळेच जिल्हे कडक तापू लागल्याने अंगाची लाही लाही थांबत नाही आहे. कुलर किंवा साध्या पंख्याची हवा ही प्रचंड उष्ण झाली आहे.
आठवडाभरापासून वातावणात दिवसागणिक प्रचंड वाढ होत आहे. महाराष्ट्रात पूर्व विदर्भाने तापामानात मुंसडी मारली आहे. यात कुलरची थंड हवाही गायब झाली आहे. साध्या पंख्याची हवा गरम येऊ लागल्याने हवा घेणे असह्य ठरत आहे. शुकवारी 45.5 अंशावर पोहचलेल्या अकोल्याला मागे टाकीत रविवारी 46 अंशावर पोहचला होता. महाराष्ट्रात आता चंद्रपूरने यवतमाळला मागे टाकत तापमान वाढीत आघाडी घेतली आहे.
चंद्रपुरातील ब्रम्हपुरी तालुक्यांत 47.2 तापमानाची नोंद करण्यात आली आहे. ब्रम्हपुरी शहराचे तापमान नेहमीच उच्चांकी असते. आज मंगळवारी तर ब्रम्हपुरी शहराने सगळ्या जिल्ह्याचा रेकॉर्ड ब्रेक करत 47.2 तापमानाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ अमरावती, नागपूर व वर्धा 45 अंशापार गेला आहे.
उष्णतेमध्ये चंद्रपूर ऑरेंज अलर्ट
राज्यात सर्व जिल्ह्यांना मागे टाकीत चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहराचे तापमान 47.2 अंशावर पोहचले आहे. हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट चा इशारा दिला आहे. आता आता पर्यंत अवकाळीचा करीता रेड, ऑरेंज यलो चा इशारा दिला जात होता,आता उष्णतेमध्ये अलर्ट मिळत आहे आज मंगळवारी एकाच दिवसासाठी उष्णलहरीचा धोका आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
हवामान खात्याने घेतलेल्या नोंदीनुसार
ब्रम्हपुरी 47.2 अंश, नागपूर 45.6, अमरावती व वर्धा 45 अंश तर चंद्रपूर 44.8, भंडारा 44.0, गोंदिया 44.0
गडचिरोली 44.0, अकोला 42.2, यवतमाळ 42.2, वाशिम 41.2, बुलढाणा 39.8 अंशावर आहे.
