रामदेव वाडी अपघात प्रकरणात एकनाथ खडसेंची उडी

जळगाव- रामदेव वाडी प्रकरणांमध्ये दि. 28 रोजी आमदार एकनाथ खडसे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले. योग्य दिशेने तपास करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, एकंदरीत हे सर्व प्रकरण पाहिल्यानंतर यात पोलिसांचा आजूनही हलगर्जी दिसत आहे. पोलिसांवर राजकीय दबाव आहे. त्यातूनच जाणीवपूर्वक आरोपींना मदत करण्याची भूमिका पोलिसांची दिसत …

रामदेव वाडी अपघात प्रकरणात एकनाथ खडसेंची उडी

जळगाव- रामदेव वाडी प्रकरणांमध्ये दि. 28 रोजी आमदार एकनाथ खडसे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले. योग्य दिशेने तपास करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, एकंदरीत हे सर्व प्रकरण पाहिल्यानंतर यात पोलिसांचा आजूनही हलगर्जी दिसत आहे. पोलिसांवर राजकीय दबाव आहे. त्यातूनच जाणीवपूर्वक आरोपींना मदत करण्याची भूमिका पोलिसांची दिसत आहे.
रामदेववाडी प्रकरणामध्ये आजपर्यंत राजकीय नेत्यांनी कोणतीही भूमिका घेतलेली दिसत नव्हती. अचानक एकनाथ खडसे यांनी या प्रकरणात उडी घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांना एक निवेदन दिले व योग्य दिशेने या गुन्ह्याचा तपास व्हावा अशी मागणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, आजपर्यंत पोलिसांनी जो तपास केला त्यामध्ये पोलिसांचा हलगर्दीपणा दिसून येत आहे. जाणीवपूर्वक आरोपींना मदत करण्याची भूमिका पोलिसांची दिसत आहे. कुठेतरी राजकीय दबावाखाली हे सर्व सुरू असल्याचे आमदार एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.
हेही वाचा –

धुळे शहरातील पाणीटंचाईवरुन शरद पवार गटाचा आंदोलनाचा इशारा
बुलढाणा: मारोड येथील ईव्हीएमचा घोळ ३२ दिवसांनी उघड; मतमोजणी वादाच्या भोवऱ्यात?