कान नदीत पोहताना बुडून 17 वर्षीय मुलाचा मृत्यू

पिंपळनेर (जि.धुळे) Bharat Live News Media वृत्तसेवा: साक्री तालुक्यातील दहिवेल येथील मयूर महेंद्र बच्छाव (वय 17) या मुलाचा कान नदीत बुडून मृत्यू झाला. आज दि. 28 दुपारी 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून मयूर हा मित्रांसोबत कान नदीत पोहण्यासाठी गेला होता. यावेळी मयूर पाण्यात गोता खात असतांना काही मेंढपाळांना दिसला. त्यांनी मदतीसाठी धावा केला असता मोठा जमाव जमा झाला आणि बुडालेल्या मयूरचा शोध सुरू झाला. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी त्याला शोधून काढले. त्याला दहिवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी साक्री पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास जमादार आर.एस.जाधव करीत आहेत.
हेही वाचा –
सोनीपतमध्ये रबर कारखान्याला भीषण आग, २० हून अधिक कामगार जखमी
Pushpa 2 : रश्मिका थिरकणार अल्लू अर्जुनसोबत, श्रेया घोषालचा गाण्याला स्वरसाज
