बुलढाणा: मारोड येथील ईव्हीएममधील घोळ ३२ दिवसांनी उघड

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा: लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात २६ एप्रिलरोजी झालेल्या मतदान प्रक्रियेत बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील मारोड (ता. जळगाव जामोद) येथील मतदान केंद्रातील (क्र. ८६) ईव्हीएममध्ये मॉकपोलचेही ५० मतदान समाविष्ट झाल्याची बाब ३२ दिवसांनी समोर आली आहे. मारोड येथील ईव्हीएममध्ये नेमका घोळ काय झाला? मारोड (ता. जळगाव जामोद) येथे ईव्हीएममध्ये मॉकपोलचे ५० मतदान समाविष्ट ईव्हीएम हाताळणीतील …

बुलढाणा: मारोड येथील ईव्हीएममधील घोळ ३२ दिवसांनी उघड

बुलढाणा, Bharat Live News Media वृत्तसेवा: लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात २६ एप्रिलरोजी झालेल्या मतदान प्रक्रियेत बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील मारोड (ता. जळगाव जामोद) येथील मतदान केंद्रातील (क्र. ८६) ईव्हीएममध्ये मॉकपोलचेही ५० मतदान समाविष्ट झाल्याची बाब ३२ दिवसांनी समोर आली आहे.
मारोड येथील ईव्हीएममध्ये नेमका घोळ काय झाला?

मारोड (ता. जळगाव जामोद) येथे ईव्हीएममध्ये मॉकपोलचे ५० मतदान समाविष्ट
ईव्हीएम हाताळणीतील तांत्रिक चुकीमुळे मॉकपोलची ५० मते समाविष्ट
ईव्हीएमची मतमोजणी वादाच्या भोव-यात सापडणार
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची ३२ दिवसांनी दिली माहिती

ईव्हीएमची मतमोजणी वादाच्या भोव-यात सापडणार
या मतदान केंद्रावरील ईव्हीएमची मतमोजणी वादाच्या भोव-यात सापडणार आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी ४ जूनच्या नियोजित मतमोजणीविषयी माहिती देण्यासाठी‌ लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली. त्यावेळी डॉ. पाटील यांनी मारोड येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम हाताळणीतील तांत्रिक चुकीमुळे मॉकपोलची ५० मतेही मतदानाच्या संख्येत समाविष्ट झाल्याचे सांगितले.
नियुक्त अधिका-यांना पूर्व प्रशिक्षण देऊनही गंभीर चूक
मतदान केंद्रावर नियुक्त अधिका-यांना पूर्व प्रशिक्षण दिले जाऊनही अशी गंभीर चूक झाली आहे. मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान केंद्र अधिकारी यांनी ५० मतांचे मॉकपोल घेऊन नंतर ईव्हीएममधील मतांचे आकडे शून्य करावयाचे असतात. मात्र, असे न केले गेल्याने मारोड येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये मॉकपोलची ५० मते समाविष्ट झाली आहेत.
या ईव्हीएमची मतमोजणी प्रारंभी केली जाणार नाही. आवश्यकतेनुसार याबाबत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विचार होईल. मॉकपोल मतदानाच्या संख्येत समाविष्ट झाल्याचा असाच प्रकार नागपूर शहरातील एका मतदान केंद्रावर उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. मारोड येथील ईव्हीएम घोळाच्या प्रकाराबाबत तेथील मतदारा़ंच्या किंवा उमेदवारांच्या प्रतिक्रिया अद्याप समोर आलेल्या नाहीत.
हेही वाचा 

बुलढाणा : लोणारच्या दैत्यसुदन मंदिरात पाच दिवस सूर्यकिरणोत्सव
बुलढाणा: भेंडवळ येथे घट मांडणी; जाणून घ्या, पर्जन्य, पीक स्थिती
बुलढाणा: ४ अवैध पिस्टलची तस्करी, चार आरोपींना अटक,सोनाळा पोलिसांची कारवाई