सोनीपतमध्‍ये कारखान्याला भीषण आग, २० हून अधिक कामगार जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील राय औद्योगिक वसाहतीमध्‍ये आज (दि.२८ मे) रबर कारखान्याला  भीषण आग लागली. कारखान्‍यातील सिलिंडरचा स्फोटही झाला. या दुर्घटनेत २० हून अधिक कामगार जखमी झाल्‍याचे वृत्त आहे. हा कारखाना रबर बेल्‍ट निर्मितीचा होता. अर्धा डझनहून अधिक कामगार अडकले होते. सोनीपत अग्निशमन विभाग आणि पोलिसांनी तत्‍काळ घटनास्‍थळी धाव घेत आगीवर नियंत्रण …

सोनीपतमध्‍ये कारखान्याला भीषण आग, २० हून अधिक कामगार जखमी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील राय औद्योगिक वसाहतीमध्‍ये आज (दि.२८ मे) रबर कारखान्याला  भीषण आग लागली. कारखान्‍यातील सिलिंडरचा स्फोटही झाला. या दुर्घटनेत २० हून अधिक कामगार जखमी झाल्‍याचे वृत्त आहे.
हा कारखाना रबर बेल्‍ट निर्मितीचा होता. अर्धा डझनहून अधिक कामगार अडकले होते. सोनीपत अग्निशमन विभाग आणि पोलिसांनी तत्‍काळ घटनास्‍थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्‍याचा प्रयत्‍न केला.

Haryana: Massive fire erupts at a factory in Sonipat’s Rai Industrial Area. Factory No. 329, engaged in rubber belt manufacturing, caught fire. Over half a dozen workers were trapped. Sonipat fire department . and police on scene. Injured workers were rushed to the hospital.… pic.twitter.com/h8iwtJa7YA
— IANS (@ians_india) May 28, 2024

कारखान्यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारखान्‍यात रबर निर्मितीेचे साहित्‍य असल्याने आगीने काही क्षणात कारखान्‍यातला आपल्‍या कवेत घेतले. १६ कर्मचार्‍यांना रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे.