सुंदर दिसते बिपाशा बसु-करणची कन्या; क्यूट व्हिडिओ व्हायरल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अभिनेता करण सिंग ग्रोव्हर हा एक अभिनेता म्हणून सगळ्यांची मने जिंकून घेतो आणि तो कलाकारांच्या सोबतीने उत्तम बाबा सुद्धा आहे, हे कायम त्याचा सोशल मीडिया वरून दिसून येत. करण अभिनेता तर आहे पण एक अष्टपैलू खेळाडू देखील आहे. नुकतच बिपाशा बसुने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये करण त्याची मुलगी देवीसोबत पेंटिंग करताना दिसत आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आल्यापासून चाहते करण आणि त्याच्या कन्येवर प्रेम व्यक्त करत आहेत. “तिची गोंडस करंगळी 😍😍 आणि ते केस उफ् माशाअल्लाह ❤️❤️ अशा कॉमेंट दिल्या जात आहे.
अधिक वाचा-
Pushpa 2 : रश्मिका थिरकणार अल्लू अर्जुनसोबत, श्रेया घोषालचा गाण्याला स्वरसाज
या अभिनेत्याने अलीकडेच सिद्धार्थ आनंदच्या ‘फायटर’मध्ये ‘स्क्वॉड्रन लीडर सरताज ‘ताज’ गिल’ या भूमिकेत आपला अभिनय पराक्रम दाखवला. तर बिपाशा बसुला अखेरचा चित्रपट अलोनमध्ये पाहण्यात आले होते. त्यानंतर ती एकाही चित्रपटात दिसली नाही.
बिपाशाची इतकी कमाई
बिपाशा बसु जाहिरातींच्या माध्यमातून लाखोंची कमाई करते. त्याशिवाय, अभिनेत्री स्टेज शो, ओपनिंग सेरेमनी वगैर च्या माध्यमातून मोठी रक्कम चार्ज करते. ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून अभिनेत्री चांगली कमाई करते. बिपाशा बसुकडे केवळ मुंबईतचं नाही तर कोलकातामध्ये स्वत:चे आलीशान घर आहे. तिच्याकडे अनेक लक्झरी गाड्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण संपत्ती १३० कोटी रुपये आहे.
अधिक वाचा-
तमन्ना भाटिया-राशि खन्ना स्टारर ‘अरनमानाई ४’ चा हिंदी ट्रेलर प्रदर्शित
या चित्रपटावेळी बिपाशा-करण पडले प्रेमात
अलोन चित्रपटादरम्यान, बिपाशा बसुला करण सिंह ग्रोवरशी प्रेम झालं होतं. त्यानंतर या कपलने २०१६ मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर तिने चित्रपटांमध्ये काम केलं नाही.
अधिक वाचा-
सिद्धार्थ आनंद सैफ अली खान सोबत घेऊन येतोय ‘ज्वेल थीफ- द रेड सन चॅप्टर’
View this post on Instagram
A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)
