येवला हळहळलं! वाहनाच्या धडकेत ५ वर्षांचा चिमुरडा ठार

येवला(जि. नाशिक) : Bharat Live News Media वृत्तसेवा- येवला शहरातील विठ्ठलनगर या नववसाहतीच्या परिसरात भरधाव असलेल्या अज्ञात वाहनच्या धडकेत ५ वर्षांचा चिमूरडा ठार झाल्याची घटना घडली आहे.
सोमवारी दि. 27 मे रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घराजवळील असलेल्या गार्डनमध्ये खेळण्यासाठी जात असताना ५ वर्षांचा रुद्र समाधान पागिरे याला भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चिमुकल्या रुद्रा पगिरे याला अपघात करणारा हा निर्दयी वाहनचालक तसाच सोडून पळून गेला.
दरम्यान परिसरातील नागरिकांनी जखमी रुद्राला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र अतिरक्तस्राव मुळे त्याची प्रकृती खालवल्यामुळे त्याला नाशिक येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उपचार चालू असताना त्याची प्राणजोत मावळली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या विठ्ठल नगर येथील रहिवाशांनी या अज्ञात वाहनधारकाचा शोध घेऊन त्याला कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली. यावेळी येवला शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश लोखंडे यांनी परिसरात या आरोपीचा शोध सुरू केला असून लवकरच त्याला गजाआड केले जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा –
Jalgaon | वाळू वाहतूक परवाना देण्याच्या मोबदल्यात लाच मागणारा तलाठी जाळ्यात
कोल्हापूर: इंचनाळमध्ये भरदिवसा घरफोडी; १९ तोळ्याच्या दागिन्यासह रोकड लंपास
Ronaldo : “रेकॉर्ड माझ्या मागे धावतात….” : रोनाल्डोच्या नावावर आणखी एक विक्रम
