बाजार लाल रंगात बंद, निफ्टी २२,९०० च्या खाली

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेअर बाजारात अस्थिरता वाढल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी मंगळवारी (दि. २८) घसरले. सेन्सेक्स २२० अंकांनी घसरून ७५,१७० वर बंद झाला. तर एनएसई निफ्टी ४४ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २२,८८८ च्या सपाट पातळीवर स्थिरावला. क्षेत्रीय आघाडीवर ऑईल आणि गॅस, कॅपिटल गुड्स, टेलिकॉम, PSU बँक, पॉवर आणि रियल्टी निर्देशांक १ ते १.५ टक्क्यांनी खाली आले. …

बाजार लाल रंगात बंद, निफ्टी २२,९०० च्या खाली

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : शेअर बाजारात अस्थिरता वाढल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी मंगळवारी (दि. २८) घसरले. सेन्सेक्स २२० अंकांनी घसरून ७५,१७० वर बंद झाला. तर एनएसई निफ्टी ४४ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २२,८८८ च्या सपाट पातळीवर स्थिरावला.
क्षेत्रीय आघाडीवर ऑईल आणि गॅस, कॅपिटल गुड्स, टेलिकॉम, PSU बँक, पॉवर आणि रियल्टी निर्देशांक १ ते १.५ टक्क्यांनी खाली आले. लोकसभा निवडणूक निकालापूर्वीच्या अस्वस्थ वातावरणात बाजारात घसरण झाली असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
बीएसई मिडकॅप- स्मॉलकॅपवर विक्रीचा दबाव
निफ्टी फार्मा वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी आज लाल रंगात व्यवहार केला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपवर विक्रीचा दबाव राहिला. बीएसई मिडकॅप ०.६ टक्क्यांनी आणि बीएसई स्मॉलकॅप जवळपास १ टक्क्यांनी घसरला.
कोणते घसरले, कोणते वाढले?
सेन्सेक्सवर पॉवर ग्रिड, टेक महिंद्रा, एनटीपीसी, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, मारुती, रिलायन्स या शेअर्समध्ये घसरण झाली. तर एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, जेएसडब्ल्यू स्टील, विप्रो, एम अँड एम हे शेअर्स तेजीत राहिले.
Sensex closing
एनएसई निफ्टीवर अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड, कोल इंडिया, बीपीसीएल, अदानी एंटरप्रायजेस हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी घसरले. तर डिव्हिस लॅब, एसबीआय लाईफ, एचडीएफसी लाईफ, ग्रासीम, हिरो मोटोकॉर्प हे २ ते ३ टक्क्यांनी वाढले.
भयसूचकांक VIX पुन्हा वाढला
शेअर बाजाराचा भयसूचकांक India VIX ४ टक्क्यांनी वाढून २४ वर पोहोचला आहे. लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्यामुळे गेल्या एका महिन्यात हा निर्देशांक आधीच १२२ टक्क्यांनी वाढला आहे. शेअर बाजाराचा चढ-उतार दर्शवणारा (व्हीक्स) राष्ट्रीय सूचकांक निफ्टीमधील वायदा बाजार व्यवहाराच्या ३० दिवसांच्या अपेक्षित चढ-उताराशी निगडित आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. यामागे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय घटक कार्यरत आहेत.
हे ही वाचा :

जाणून घ्या ‘नवीन करप्रणाली’तील कर बचतीचे पर्याय
वेध शेअर बाजाराचा : सरकारला डिव्हिडंड; गुंतवणूकदार मालामाल!