राहुल गांधींनी आधी सैन्यात काम करावे: व्ही.के.सिंह

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काँग्रेस सत्तेवर येताच अग्निवीर योजना बंद करण्याची घोषणा केली आहे. यावर केंद्रीय मंत्री जनरल व्ही. के. सिंह (निवृत्त) यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. सिंह यांनी आज (दि.२८) राहुल गांधींना लष्कराबाबत काहीही माहीत नसताना बोलू नका, असा सल्ला दिला आहे. व्ही.के.सिंह यांनी राहुल गांधींवर का टीका केली? …

राहुल गांधींनी आधी सैन्यात काम करावे: व्ही.के.सिंह

नवी दिल्ली; Bharat Live News Media वृत्तसेवा: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काँग्रेस सत्तेवर येताच अग्निवीर योजना बंद करण्याची घोषणा केली आहे. यावर केंद्रीय मंत्री जनरल व्ही. के. सिंह (निवृत्त) यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. सिंह यांनी आज (दि.२८) राहुल गांधींना लष्कराबाबत काहीही माहीत नसताना बोलू नका, असा सल्ला दिला आहे.
व्ही.के.सिंह यांनी राहुल गांधींवर का टीका केली?

राहुल गांधी यांचा अग्निवीर योजनेला विरोध
अग्निवीर योजनेवरून त्यांची मोदी सरकारवर टीकास्त्र
मोदी सरकारने देशातील सैनिकांना मजूर बनवले आहे.
काँग्रेस सत्तेवर येताच अग्निवीर योजना बंद करण्याची घोषणा

राहुल गांधी म्हणाले होते की, अग्निवीर योजना लागू करून मोदी सरकारने देशातील सैनिकांना मजूर बनवले आहे. यावर उत्तर देताना व्ही.के. सिंह म्हणाले की, मी राहुल गांधींना सल्ला देतो की, त्यांनी आधी सैन्यात काम करावे आणि नंतर अग्निवीर योजनेबाबत वक्तव्य करावे. त्यांनी लष्कराबद्दल काही माहीत नसेल, तर त्यांनी लष्करावर न बोलणे योग्य होईल.
राहुल गांधी यांनी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार भारतीय सैनिकांना मजूर बनविल्याचा आरोप केला होता. 4 जून रोजी काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर अग्निवीर योजना बंद करण्याचे आश्वासन दिले होते. हरियाणाच्या महेंद्रगडमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, हरियाणा आणि इतर राज्यांतील तरुण भारताच्या सीमांचे रक्षण करतात.
हेही वाचा 

Rahul Gandhi: राहुल गांधी दिल्लीत मेट्रोने प्रवास करतात तेव्हा…
Lok Sabha Election 2024 : इंडिया आघाडीच्‍या ‘एकजुटी’साठी राहुल गांधी सरसावले
पाकिस्तानच्या अणुबॉम्बला राहुल गांधी यांनीच घाबरावे : अमित शहा