खालप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी मुरलीधर अहिरे यांची बिनविरोध निवड

देवळा ; तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या खालप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी मुरलीधर आंनदा अहिरे यांची निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच बाजीराव सूर्यवंशी यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी मंगळवारी (दि. २८ )रोजी दुपारी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच विमल सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक बोलविण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी मुरलीधर आंनदा …

खालप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी मुरलीधर अहिरे यांची बिनविरोध निवड

देवळा ; तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या खालप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी मुरलीधर आंनदा अहिरे यांची निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच बाजीराव सूर्यवंशी यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी मंगळवारी (दि. २८ )रोजी दुपारी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच विमल सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक बोलविण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी मुरलीधर आंनदा अहिरे यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने अहिरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. त्यांना सूचक म्हणून बाजीराव सूर्यवंशी  यांनी स्वाक्षरी केली .
यावेळी ग्रामपंचायत सदस्य विजया देवरे, सुनील सूर्यवंशी, बेबीबाई सूर्यवंशी, कांताबाई पिपळसे उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच मुरलीधर अहिरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  फटाक्यांच्या आतषबाजीत अहिरे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी शेतकरी संघाचे माजी चेअरमन व युवा उधोजक कैलास देवरे, अविनाश सूर्यवंशी, जिभाऊ सूर्यवंशी, साहेबराव सूर्यवंशी, पोपट सुर्यवंशी, प्रशांत सुर्यवंशी, प्रवीण सुर्यवंशी, दिनेश सोनार, दिनकर सूर्यवंशी, फुलाजी सूर्यवंशी, उमेश सुर्यवंशी, भगवान आहिरे, निबा सूर्यवंशी, सोपान अहिरे, कौतिक सूर्यवंशी, ग्रामविकास अधिकारी जितेंद्र झाल्टे आदींसह ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते.
नूतन उपसरपंच अहिरे यांचे आमदार डॉ. राहुल आहेर, नाफेडचे राज्य संचालक केदा आहेर, देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, वसाकाचे माजी संचालक आनंदा देवरे ,भाऊसाहेब पगार आदींनी अभिनंदन केले आहे .
हेही वाचा –

Kirti Vyas murder case | कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा
जळगाव : रस्त्यावरील स्लोपच नाहीसे झाल्याने विविध चर्चांना उधाण; वाहनचालकांचा जीव घेणा प्रवास