Good News : वायुप्रदूषण घटले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अवकाळी पावसामुळे धूलीकण खाली बसून हवेच्या पातळीची गुणवत्ता वाढल्याचे सांगितले जात आहे. दिवाळीत पिंपरी-चिंचवड शहरातील हवेची गुणवत्ता खूपच ढासळली होती. भोसरी परिसरातील हवेची गुणवत्ता पातळी (एअर क्वालिटी इंडेक्स एक्यूआर) 394 इतक्या धोकादायक पातळीवर जाऊन पोहोचला होता.  या स्तरावरील हवेची गुणवत्ता अतिशय … The post Good News : वायुप्रदूषण घटले appeared first on पुढारी.
#image_title

Good News : वायुप्रदूषण घटले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अवकाळी पावसामुळे धूलीकण खाली बसून हवेच्या पातळीची गुणवत्ता वाढल्याचे सांगितले जात आहे. दिवाळीत पिंपरी-चिंचवड शहरातील हवेची गुणवत्ता खूपच ढासळली होती. भोसरी परिसरातील हवेची गुणवत्ता पातळी (एअर क्वालिटी इंडेक्स एक्यूआर) 394 इतक्या धोकादायक पातळीवर जाऊन पोहोचला होता.  या स्तरावरील हवेची गुणवत्ता अतिशय घातक असते.
तर, निगडी परिसरात 338 इतका एक्यूआर होता. थंडीमुळे हवेतील कोरडेपणा वाढला आहे. त्यामुळे दिवसात धुलीकण वर न जाता हवेतच तरंगतात. त्यामुळे हवेतील धूलीकणांची वाढती घनता मानवी आरोग्यास धोकादायक मानली जाते. यात फटाके व आतषबाजीची भर पडली होती. तसेच, सुरू असलेल्या बांधकामे, खाणीतून काढले जाणारे दगड, क्रशर मशिन, खोदकाम आदींमुळे धूलीकण मोठ्या प्रमाणात तयार होतात.
ते प्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर घालतात. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने 16 पथके तैनात करण्यात आली आहेत. त्यांनी नियमांचे उल्लंघन करणारे बांधकाम व्यावसायिक व ठेकेदारांवर कारवाई केली. बांधकाम करताना पाणी फवारणे व त्या ठिकाणी हिरव्या रंगाचे कापड लावणे.
हवेची गुणवत्ता सुधारली
केंद्र शासनाच्या सिस्टीम ऑफ एअर क्लालिटी अ‍ॅण्ड वेदर फॉरकास्टींग अ‍ॅण्ड रिसर्च (सफर) संस्थेच्या मंगळवार (दि.28) च्या ताज्या आकडेवारीनुसार शहराची हवेची गुणवत्ता खूपच सुधारली आहे. मंगळवारी भोसरी भागात केवळ 68 इतका एक्यूआर नोंदविला गेला. तर, निगडी भागात 71 आणि भूमकर चौकात 59 इतका एक्यूआरची नोंद झाली आहे. ही बाब शहरवासीयांसाठी समाधानकारक आहे.
हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. रस्त्यांची रोड वॉशर वाहनांद्वारे साफसफाई केली जात आहे. तसेच, मुख्य चौकांतील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी मुव्हेबल फॉग कॅनन डस्ट सप्रेशन प्रणालीची 5 वाहने फिरविण्यात येत आहेत. रस्त्यावर पडलेली माती काढली जात आहे. धूळ निर्माण करणार्‍या बांधकाम ठिकाणावर, तसेच, कचरा जाळणार्‍यांवर विविध 16 पथकांकडून दररोज कारवाई केली जात आहे. अनेकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहराच्या हवेतील प्रदूषण कमी होत आहे.
– संजय कुलकर्णी,
सहशहर अभियंता, पर्यावरण अभियांत्रिकी विभाग

गुणवत्तेचे मोजमाप
एक्यूआर 0 ते 50 असल्यास हवेची गुणवत्ता उत्तम असल्याचे समजले जाते. तर, 50 ते 100 एक्यूआर समाधानकारक मानले जाते. 200 ते 300 एक्यूआर खराब आणि 300 ते 400 एक्यूआर अधिक खराब, 400 ते 500 एक्यूआर धोकादायक मानला जातो.
 कचरा जाळणे, प्रदूषणात भर घालण्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील प्रदूषण घटत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. त्यात रविवारी (दि. 26) सायंकाळनंतर शहरातील बहुतांश भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणातील धूलीकण खाली बसले. परिणामी, प्रदूषणात मोठी घट होऊन हवेची गुणवत्ता सुधारली.

हेही वाचा
वेडिंग रील्सकडे जोडप्यांचा कल
Pune : अवकाळी पावसाने शेकडो एकर ऊस भुईसपाट
छत्रपती संभाजीनगर : नाथसागर धरणातील पाण्याचे जलपूजन संपन्न
The post Good News : वायुप्रदूषण घटले appeared first on पुढारी.

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अवकाळी पावसामुळे धूलीकण खाली बसून हवेच्या पातळीची गुणवत्ता वाढल्याचे सांगितले जात आहे. दिवाळीत पिंपरी-चिंचवड शहरातील हवेची गुणवत्ता खूपच ढासळली होती. भोसरी परिसरातील हवेची गुणवत्ता पातळी (एअर क्वालिटी इंडेक्स एक्यूआर) 394 इतक्या धोकादायक पातळीवर जाऊन पोहोचला होता.  या स्तरावरील हवेची गुणवत्ता अतिशय …

The post Good News : वायुप्रदूषण घटले appeared first on पुढारी.

Go to Source