शनिशिंगणापूर रस्त्यावर अंत्यविधीचा प्रयत्न!

राहुरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : गोटूंबे आखाडा हद्दीतील रविवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास रस्ता ओलांडताना गयाबाई गंगाराम तमनर यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांसह विविध संघटनांनी शनि शिंगणापूर रस्त्यावरच अंत्यविधीचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. शनि शिंगणापूर रस्त्यावर तासभर मृतदेह ठेवत आंदोलनकर्त्यांनी गतिरोधक तसेच रस्त्यावर सूचना फलक लावण्याची मागणी केली. दरम्यान, प्रशासनाने दोन दिवसांत मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृत महिलेवर अमरधामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेल्या अनेक दिवसांपासून गोटूंबे आखाडा हद्दीत गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत होती. परंतु प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडून 9 ते 10 जणांचा अपघाती बळी गेला. दरम्यान, प्रशासनाच्या दुर्लक्षित भुमिकेने रविवारी सायंकाळी 7 वाजता गयाबाई तमनर या रस्ता ओलांडत असताना त्यांना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी शिंगणापूर रस्ता प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवित रास्तारोकोचा निर्णय घेतला. काल सोमवारी सकाळी ग्रामस्थांनी शिंगणापूर रस्त्यावरच अंत्यविधी करण्याचा निर्धार केला. मृतदेह घेऊन शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर येताच प्रशासन गोंधळून गेले. याप्रसंगी नायब तहसीलदार संध्या दळवी व पोलिस प्रशासनासह रस्ते विभागाच्या अधिकार्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
याप्रसंगी यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून या मार्गाचे अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे काम झाले आहे. ठेकेदाराने अनेकांचे बळी घेतले आहे. केवळ गोटूंबे आखाडा हद्दीतच 10 जणांचा रस्ते अपघातात बळी गेल्याची खंत व्यक्त केली.
आण्णासाहेब बाचकर.उमेश बाचकर, माजी सरपंच ज्ञानेश्वर बाचकर यांनी दोन दिवसामध्ये रस्त्यावर गतीरोधक बसविले नाही तर स्वतः ग्रामस्थ व संघटना पुढाकार घेऊन रस्त्यावर खोदकाम करून रस्ता बंद करू असा ईशारा दिला. याप्रसंगी नायब तहसीलदार संध्या दळवी, पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. दोन दिवसातच ग्रामस्थांच्या मागणीनुसार गतिरोधक बसवून अपघात घडणार नाही, यासाठी उपयुक्त निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. याप्रसंगी गणेश रहाणे, भरत पवार, दीपक लांबे, नंदूभाऊ हरिश्चंद्रे, दशरथ बोरकर, सुभाष शेटे, सुनिल तनपुरे, दीपक पटारे, नंदकुमार हरिश्चंद्रे, रविंद्र चौधरी, रावसाहेब होडगर, रामदास नेटके आदी उपस्थित होते.
हेही वाचा
सव्वा कोटी खर्चाच्या रस्त्याची दुरवस्था; सोनोरी-वनपुरी रस्त्याचे काम निकृष्ट
संदेशखाली प्रकरण : आरोपी शाहजहान शेखविरोधात आरोपपत्र दाखल
Manipur Violence : मणिपुरातील चुरचंदपूरचा संपर्क देशापासून तुटला! बंडखोरांचे बंकर लष्कराकडून उद्ध्वस्त
