सव्वा कोटी खर्चाच्या रस्त्याची दुरवस्था; सोनोरी-वनपुरी रस्त्याचे काम निकृष्ट

सासवड : पुढारी वृत्तसेवा : सोनोरी-वनपुरी या रस्त्यावर तब्बल 50 वर्षांनी शासनाचा 1 कोटी 25 लाखांचा निधी खर्च झाला. मात्र, ठेकेदाराने या रस्त्याची पूर्ण  वाट लावली आहे. अत्यंत निकृष्ट काम केल्याने हा रस्ता किती दिवस टिकेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकाच पावसात त्याची दुर्दशा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याचे काम दर्जेदार करा; अन्यथा तुम्हाला …

सव्वा कोटी खर्चाच्या रस्त्याची दुरवस्था; सोनोरी-वनपुरी रस्त्याचे काम निकृष्ट

सासवड : Bharat Live News Media वृत्तसेवा : सोनोरी-वनपुरी या रस्त्यावर तब्बल 50 वर्षांनी शासनाचा 1 कोटी 25 लाखांचा निधी खर्च झाला. मात्र, ठेकेदाराने या रस्त्याची पूर्ण  वाट लावली आहे. अत्यंत निकृष्ट काम केल्याने हा रस्ता किती दिवस टिकेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकाच पावसात त्याची दुर्दशा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याचे काम दर्जेदार करा; अन्यथा तुम्हाला कामच करू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे युवानेते संतोष कुंभारकर यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे. सोनोरी-वनपुरी हा साधारण अडीच किलोमीटरचा रस्ता असून, या दोन्ही गावांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. याच मार्गावरून पुढे वाघापूरला जाणे सोईस्कर आहे. तसेच दिवे, सोनोरी, वनपुरीकडे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते.
50 वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार दादा जाधवराव यांच्या प्रयत्नातून हा रस्ता तयार झाला. त्यानंतर आजपर्यंत त्यावर एक रुपयाचाही निधी खर्च झाला नसल्याने रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. तसेच हा रस्ता अत्यंत खराब झाल्याने अनेक वर्षे वाहतूक जवळपास बंदच होती. त्याचा नागरिकांना मोठा त्रास होत होता. त्यामुळे वनपुरी आणि सोनोरी ग्रामस्थांकडून या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी सातत्याने केली होती. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रयत्नातून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील वर्षी सुमारे 1 कोटी 25 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रस्त्याचे काम सुरू झाले. मात्र, संबंधित ठेकेदाराने अत्यंत घाईगडबडीने काम करण्याचा सपाटाच लावला. रात्रीच्या वेळी निकृष्ट काम केले.
पाहणीनंतर ग्रामस्थांनी घेतला आक्षेप
संतोष कुंभारकर, हरिश्चंद्र राऊत, राहुल शिर्के, सचिन मगर, ज्ञानदेव कुंभारकर, सागर कुंभारकर आदी ग्रामस्थांनी या कामावर आक्षेप घेतला आहे. दरम्यान, याबाबत पीएमआरडीएचे कनिष्ठ शाखा अभियंता तसेच संबंधित रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदाराला कामासंदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
हेही वाचा

गडचिरोली : ६ लाखांचे बक्षीस असलेल्‍या जहाल नक्षल्‍याचे पोलिसांपुढे आत्‍मसमर्पण
‘शेअर मार्केट’चा शेवगावात पहिला बळी!
कोयत्याने वार करून मित्राला संपविले; मांडवे येथील खुनाचा उलगडा