वाहनचालकांचा जीव घेणा प्रवास; रस्त्यावरील स्लोपच झाले नाहीसे

जळगाव : नरेंद्र पाटील – जळगाव जिल्ह्यात मध्यंतरीच्या काळात मुख्य रस्ते कलेक्टर ऑफिस, कलेक्टर बंगला, एसपी ऑफिस या भागांमध्ये तसेच शहरातील इतर भागांमध्ये सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे काम झालेले आहे. यापैकीच एक मार्ग आकाशवाणी ते क्रीडा संकुलनापर्यंत आहे. मात्र सध्यस्थितीत येथील रस्त्यात स्लोप न करता तसाच सोडून देण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांना  धोकादायक परिस्थितीत वाहने हाकावी लागत …

वाहनचालकांचा जीव घेणा प्रवास; रस्त्यावरील स्लोपच झाले नाहीसे

जळगाव : नरेंद्र पाटील – जळगाव जिल्ह्यात मध्यंतरीच्या काळात मुख्य रस्ते कलेक्टर ऑफिस, कलेक्टर बंगला, एसपी ऑफिस या भागांमध्ये तसेच शहरातील इतर भागांमध्ये सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे काम झालेले आहे. यापैकीच एक मार्ग आकाशवाणी ते क्रीडा संकुलनापर्यंत आहे. मात्र सध्यस्थितीत येथील रस्त्यात स्लोप न करता तसाच सोडून देण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांना  धोकादायक परिस्थितीत वाहने हाकावी लागत आहेत. या रस्त्यामुळे संभाव्य अपघात होण्याची शक्यता असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार नरेंद्र शिष यांच्याकडे संशयाच्या नजेरतून बघितले जात आहे.
जळगाव शहरात आकाशवाणी चौकापासून ते क्रीडा भावनापर्यंत सिमेंट काँक्रीट करण्याचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. यामध्ये कलेक्टर ऑफिस, बसस्थानक, एस पी ऑफीस, क्रीडा भवन या ठिकाणापर्यंत रस्ते झालेले आहेत. मात्र वळणावरील ठिकाणी कोणत्याही प्रकारचे स्लोप बनविण्यात आला नसून तात्पुरते पिवळी माती व दगडे टाकून सोपस्कार मार्ग करण्यात आला आहे. त्यामुळे वाहन चालकांना विविध कसरती करुन मार्गक्रमण करावे लागत आहे.

या मार्गावरुन दररोज एसटी महामंडळाच्या बसेसच्या फेऱ्या सुरु असतात. माती टाकल्याने निसरड्या रस्त्यावरुन अवजड वाहनांमुळे छोट्या वाहनचालकांना संभाव्य अपघातांना सामोरे जावे लागू शकते. पावसाळा जवळ ठेपला असून रस्त्याचे काम बाकी असल्याने कोणती मुहुर्त ठेकेदारांना मिळत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. एक रस्त्याचे काम पूर्ण न करता दुसरीकडे अर्धवट रस्त्याचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे वाहनचालकांचा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित हाेत आहे.

गेल्या एक दीड महिन्यापासून सर्व कर्मचारी हे निवडणुकीच्या कामकाजात व्यस्त होते. तरी येत्या दोन-तीन दिवसांमध्ये रस्त्याचे काम पूर्णात्वास येईल. – प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव.