पठ्ठ्यानं थेट जीसीबीचं काढला; दहावी पासचे अनोखे सेलिब्रेशन

उरण: पुढारी वृत्तसेवा: दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी बहुतांश विद्यार्थ्यांची वर्षभर कठोर मेहनत सुरू असते. परंतु, काही विद्यार्थ्यांची केवळ पास होण्यासाठी धडपड सुरू असते. आणि नुसते पास झाले तरी त्यांचा आनंद गगनात मावत नाही. असाच एक प्रकार रायगड जिल्ह्यातील चिरनेर गावात घडला आहे. सार्थक अनंता नारंगीकर हा मित्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने गावातील …

पठ्ठ्यानं थेट जीसीबीचं काढला; दहावी पासचे अनोखे सेलिब्रेशन

उरण: Bharat Live News Media वृत्तसेवा: दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी बहुतांश विद्यार्थ्यांची वर्षभर कठोर मेहनत सुरू असते. परंतु, काही विद्यार्थ्यांची केवळ पास होण्यासाठी धडपड सुरू असते. आणि नुसते पास झाले तरी त्यांचा आनंद गगनात मावत नाही. असाच एक प्रकार रायगड जिल्ह्यातील चिरनेर गावात घडला आहे. सार्थक अनंता नारंगीकर हा मित्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने गावातील मित्रांनी चक्क ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत मोटारसायकल व जेसीबीवरुन मिरवणूक काढली.
सध्याची तरुण पिढी ही अभ्यासाची कास न धरता मोबाईल मध्ये आपले लक्ष केंद्रित करून आपला वेळ, आयुष्य वाया घालवीत आहे. त्यात चिरनेर गावातील सार्थक अनंता नारंगीकर हा तरुण शाळेतील अभ्यासक्रमात लक्ष न देता मोबाईल व इतर बाबींकडे लक्ष केंद्रित करत होता. त्यामुळे तो दहावीच्या परीक्षेत नापास होणार, असे त्यांच्याबद्दल मित्रांमध्ये तर्कवितर्क लावण्यात येत होते.
परंतु, सार्थकने त्यांच्या मित्रांना वचन दिले की, मी दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणार आहे. नुकताच दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात सार्थक नारंगीकर या विद्यार्थ्यांला दहावीच्या परीक्षेत ५० टक्के गुण मिळवून तो उत्तीर्ण झाला. ही आनंदाची बातमी गावातील मित्रांना कळताच मित्रांनी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत सार्थक (भाई ) नारंगीकर ची मोटारसायकल व जेसीबी वरुन मिरवणूक काढली आहे. यावेळी गावातील अनेक नागरिकांनी सार्थकचे अभिनंदन केले.
हेही वाचा 

10th SSC Result 2024: दहावीचा निकाल जाहीर, नेहमीप्रमाणे.. मुलींनीच मारली बाजी
SSC Result : ट्रक ड्रायव्हरच्या मुलीचे नेत्रदीपक यश; दहावी परीक्षेत ९३ टक्क्यांना गवसणी
Maharashtra SSC 10th Results 2024 | दहावीचा निकाल ९५.८१ टक्के, सोप्या ‘या’ ५ स्टेप्स, पाहा तुमचा निकाल