केजरीवालांना धक्‍का, याचिकेवर तत्‍काळ सुनावणीस न्‍यायालयाचा नकार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाची मुदत वाढवण्याच्या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दिल्ली मद्य धोरण प्रकरणी केजरीवाल यांना न्‍यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता. प्रकृतीच्या कारणास्तव जामिनाची मुदत सात दिवसांनी वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी या याचिकेवर …

केजरीवालांना धक्‍का, याचिकेवर तत्‍काळ सुनावणीस न्‍यायालयाचा नकार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाची मुदत वाढवण्याच्या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दिल्ली मद्य धोरण प्रकरणी केजरीवाल यांना न्‍यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता. प्रकृतीच्या कारणास्तव जामिनाची मुदत सात दिवसांनी वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली.मागील आठवड्यात न्‍यायमूर्ती दत्ता यांच्‍या खंडपीठासमोर याचिका का दाखल केली नाही, असा सवाल करत तत्‍काळ सुनावणीची मागणी सर्वोच्‍च न्‍यायालयाने नाकारली. याबाबत आम्ही कोणताही आदेश देऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले. याप्रकरणी सरन्यायाधीशांकडे जावे. याप्रकरणी सरन्यायाधीशच निर्णय घेतील, असे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश जेके माहेश्वरी यांच्या खंडपीठाने स्‍पष्‍ट केले.

CJI Will Decide On Listing Of Arvind Kejriwal’s Plea To Extend Interim Bail, Says Supreme Court Vacation Bench | @mittal_mtn #ArvindKejriwal #SupremeCourt https://t.co/CbwLQOtQWl pic.twitter.com/NGM2BDsOtV
— Live Law (@LiveLawIndia) May 28, 2024

दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक केली. या अटकेविरोधात केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, मात्र उच्च न्यायालयाने त्‍यांची याचिका फेटाळली. यानंतर त्‍यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 10 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केजरीवाल यांना जामीन देताना न्यायालयाने काही अटीही घातल्या असून केजरीवाल यांना १ जून रोजी तुरुंगात परतावे लागेल, असे स्‍पष्‍ट केले होते. आता केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून जामीन आणखी सात दिवस वाढवण्याची मागणी केली आहे. केजरीवाल यांनी याचिकेत म्हटले आहे की, त्यांना काही आरोग्य तपासण्या कराव्या लागतील ज्यात पीईटी आणि सीटी स्कॅन इत्यादींचा समावेश आहे.
हेही वाचा : 

लग्नास नकार दिला म्हणून धर्मगुरूने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल..
भाजपला त्यांच्या शब्दाची आठवण करून द्या, मंत्री भुजबळांची अजित पवारांकडे मागणी
Goa Monsoon Tourism : गोव्यात जाताय? मग पावसाळ्यात जा! ‘या’ सणांचा उत्सव आहे खास