अनंत अंबानी-राधिकाच्या प्री-वेडिंगची तयारी सुरु, शकीराची होणार एन्ट्री?

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे दुसरे प्री-वेडिंग फंक्शन क्रुझवर होत आहे. हे फंक्शन २९ मे ते १ जून पर्यंत सुरु राहणार आहे. दोघे जुलैमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार असून आता कोलंबियन सिंगर शकीरा या फंक्शनमध्ये सहभागी होईल. शकीरा भारतात वाका वाका, हिप्स डोंट लाय, वेअरएवर यासारख्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. या क्रुझ …

अनंत अंबानी-राधिकाच्या प्री-वेडिंगची तयारी सुरु, शकीराची होणार एन्ट्री?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे दुसरे प्री-वेडिंग फंक्शन क्रुझवर होत आहे. हे फंक्शन २९ मे ते १ जून पर्यंत सुरु राहणार आहे. दोघे जुलैमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार असून आता कोलंबियन सिंगर शकीरा या फंक्शनमध्ये सहभागी होईल. शकीरा भारतात वाका वाका, हिप्स डोंट लाय, वेअरएवर यासारख्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. या क्रुझ पार्टींमध्ये इवांका ट्रम्प, बिल गेट्स, मार्क जकरबर्ग यासारखे दिग्गज उपस्थित राहतील. हे फंक्शन इटलीच्या क्रुझमध्ये होईल. हे क्रुझ इटलीहून फ्रान्सपर्यंत जाईल.

अधिक वाचा-

टायगर श्रॉफ नव्या अवतारात; करण जोहर आणतोय भव्य चित्रपट

८०० व्हीआयपी गेस्ट सहभागी होणार
अनंत-राधिकाच्या ग्रँड प्री-वेडिंगमध्ये ८०० व्हीआयपी गेस्ट सहभागी होतील. सोशल मीडियावर प्री-वेडिंग फंक्शन कार्ड व्हायरल होत आहे. या फंक्शनसाठी जे कार्ड तयार झाले आहे, त्याची थीम व्हाईट आणि ब्ल्यू कलर ठेवली आहे. या कार्डनुसार, २० मे रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत लंच पार्टी होईल. नाईट प्रोग्रॅमची थीम वेस्टर्न आऊटफिट ठेवण्यात आले आहे. याआधी मार्चमध्ये झालेल्या फंक्शनमध्ये सिंगर रिहानाने सादरीकरण केलं होतं. आता शकीराला या फंक्शनसाठी तगडी रक्कमही दिल्याचे म्हटले जाते. पण याबाबक तिच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

अधिक वाचा-

Nancy Tyagi ची भावूक कहाणी| ‘भीती वाटायची, आईचा हात मशीनमध्ये सापडला तर?’

किती मानधन घेत शकीरा?
शकीरा खासगी इव्हेंटमध्ये सादरीकरण करण्यासाठी १० कोटी ते १५ कोटी रुपये घेते. रिहानाला सादरीकरण करण्यासाठी ७४ कोटी रुपये इतकी मोठी रक्कम देण्यात आली होती.

शकीराची संपत्ती किती?
शकीराची संपत्ती २०२४ मध्ये ३०० मिलियन डॉलर म्हणजे अडीच हजार कोटी अशल्याचे म्हटले जाते. स्टेज परफॉर्मन्स, प्रायव्हेट इवहेंट्स, पब्लिक प्रेझेंन्सच्या माध्यमातून तिची कमाई होत राहते.
shakira
video- radhikamerchantfp insta वरून साभार
अधिक वाचा-

IPL 2024 : शाहरुखने केले किस; गौरीने दिली अशी पोज, सुहानाने कडकडून मारली मिठी

 

View this post on Instagram

 
A post shared by radhikamerchantfp (@radhikamerchant_)