Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: पुढील तीन दिवसानंतर म्हणजेच गुरुवारपासून (दि.३० मे) देशांतील उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. दरम्यान केरळमध्ये मान्सूनसाठी पोषकस्थिती निर्माण होत असून, लवकरच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. भारतातील काही भागांत मान्सून सामान्यपेक्षा जास्त (Monsoon Update) असण्याची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. या संदर्भातील माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. एस. होसाळीकर यांनी दिली.
आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी आज (दि.२७) “नैऋत्य मान्सून, 2024 च्या पल्ल्याचा दुसरा टप्पा’ या विषयावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना मान्सून (Monsoon Update) संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
नैऋत्य मोसमी मोसमी(जून-सप्टेंबर 2024) पाऊस: 📌मध्य भारत व दक्षिण भारतात सामान्यपेक्षा जास्त असण्याची शक्यता (>LPA च्या 106 %).
📌वायव्य भारतात सामान्य (LPAच्या 92-108%)
📌ईशान्य भारतात सामान्यपेक्षा कमी (LPAच्या <94%)
📌मान्सून कोर झोन(MCZ)वर सामान्यपेक्षा जास्त (> LPAच्या 106%).
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 27, 2024
ईशान्य भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस
भारतातील मध्य भारत व दक्षिण भारतात सामान्यपेक्षा जास्त असण्याची शक्यता (>LPA च्या 106 %) आहे. यामध्ये कमी जास्त ± 4% पाऊस होऊ शकतो. वायव्य भारतात सामान्य (LPAच्या 92-108%), ईशान्य भारतात सामान्यपेक्षा कमी (LPAच्या <94%) तर मान्सून कोर झोनमध्ये देखील (MCZ) सामान्यपेक्षा जास्त (> LPAच्या 106%) पावसाची (Monsoon Update) शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
देशभरात सामान्यपेक्षा जास्त पाऊस
संपूर्ण देशभरात मान्सूनचा हंगामी पाऊस ± 4% च्या मॉडेल त्रुटीसह दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या (LPA) 106% असण्याची शक्यता. पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर), 2024 या कालावधीत संपूर्ण देशभरात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे देखील हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दुसऱ्या टप्प्याचे मान्सून 2024 पूर्वानुमान:
📌 संपूर्ण देशभरात मान्सूनचा हंगामी पाऊस ± 4% च्या मॉडेल त्रुटीसह दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या (LPA) 106% असण्याची शक्यता.
📌 पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर), 2024 या कालावधीत संपूर्ण देशभरात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता.
IMD pic.twitter.com/A8tZmu62sD
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 27, 2024