Pune Porsche Car Accident : सांगा, डॉ. तावरेला कोणी कोणी मदत केली?

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगर ड्रंक अ‍ॅन्ड ड्राइव्ह अपघातप्रकरणी ससून सर्वोपचार रुग्णालयातील न्याय वैद्यकशास्त्र विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे याचे नाव समोर आले. त्याचा या गुन्ह्यातील सहभाग मोठा असल्याचे सांगितले जात आहे. त्याचे इतर प्रकरणांमध्येही हात बरबटले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता त्याला मदत करणारेही पुणे पोलिसांच्या रडारवर आले आहेत. डॉ. अजय तावरे आणि …

Pune Porsche Car Accident : सांगा, डॉ. तावरेला कोणी कोणी मदत केली?

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : कल्याणीनगर ड्रंक अ‍ॅन्ड ड्राइव्ह अपघातप्रकरणी ससून सर्वोपचार रुग्णालयातील न्याय वैद्यकशास्त्र विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे याचे नाव समोर आले. त्याचा या गुन्ह्यातील सहभाग मोठा असल्याचे सांगितले जात आहे. त्याचे इतर प्रकरणांमध्येही हात बरबटले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता त्याला मदत करणारेही पुणे पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
डॉ. अजय तावरे आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हळनोर यांना प्रत्येकी 3 लाख रुपये देणारा ससून रुग्णालयाच्या शवागारातील तृतीय श्रेणी कर्मचारी अमित ऊर्फ मॅक्स घटकांबळे पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.
त्यामुळे रक्ताचे नमुने, फोरेन्सिक रिपोर्ट बदलणारे रॅकेट कार्यरत होते का? याची चाचपणी पुणे शहर पोलिस करीत आहेत. याला पुणे शहर पोलिसांनी दुजोरा दिला आहे. या अपघात प्रकरणानंतर आणखी काही जुन्या प्रकरणांमध्ये आर्थिक देवाणघेवाण करीत अहवालांमध्ये फेरफार केला आहे का? याची देखील काटेकोर तपासणी केली जात आहे. त्यामुळे डॉ. अजय तावरे याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. किडनी रॅकेट, ललित पाटील प्रकरण आणि उंदीर चावून रुग्णाचा मृत्यू प्रकरणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष त्याचा सहभाग होता. त्यामुळे डॉ. तावरेच्या भोवती चौकशीचा फास आवळला जाण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंतच्या अनधिकृत, बेकायदेशीर कामांमध्ये आर्थिक देवाणघेवाणीमध्ये आणखी काही अधिकारी व कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता वाढली आहे. पुणे शहर पोलिसांकडून विशाल अगरवाल याच्या राहत्या बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज, तसेच ससून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर घटकांबळे याला पुणे शहर गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा

हत्‍या प्रकरणी डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम निर्दोष
वाढीव आकाराची होर्डिंग सात दिवसांत काढावीत; पालिकेचा इशारा
दिल्लीतील नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी संचालकांना पोलीस कोठडी