‘रेमल’चा तडाखा; मिझोराममध्ये दगडी खाण कोसळून १० ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क: ‘रेमल’ चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मिझोराममधील ऐझॉल शहराऐझॉल शहरातील दगडी खाण कोसळली. या दुर्घटनेत १० खाण कामगारांचा मृत्यू झाला, तर अनेकजण बेपत्ता झाले आहेत. खाण कोसळल्याने आजूबाजूची अनेक घरेही उद्ध्वस्त झाली आहेत. या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. बंगालच्या …
‘रेमल’चा तडाखा; मिझोराममध्ये दगडी खाण कोसळून १० ठार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: ‘रेमल’ चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मिझोराममधील ऐझॉल शहराऐझॉल शहरातील दगडी खाण कोसळली. या दुर्घटनेत १० खाण कामगारांचा मृत्यू झाला, तर अनेकजण बेपत्ता झाले आहेत. खाण कोसळल्याने आजूबाजूची अनेक घरेही उद्ध्वस्त झाली आहेत. या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ ‘रेमल’ने पश्चिम बंगाल, बांगलादेश आणि आता मिझोराममध्ये थैमान घातले आहे. रेमल चक्रीवादळाने राज्यभर हाहाकार माजवल्यानंतर मिझोरामधील ऐझॉल शहराच्या दक्षिणेकडील सीमेवरील मेल्थम आणि ह्लिमेन दरम्यानच्या भागात असलेली दगडी खाण कोसळून सकाळी ६ च्या सुमारास ही दुर्घटना घडली.

10 dead in Mizoram stone quarry collapse as cyclone wreaks havoc
Read: https://t.co/9UQYttS4ln#Mizoram #ITCard #cyclone pic.twitter.com/ZgihwUSK9L
— IndiaToday (@IndiaToday) May 28, 2024

अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती
मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तथापि, इतर अनेक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. संततधार पावसामुळे बचावकार्यावर परिणाम होत असल्याचेही त्यांनी सांगितले, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
राष्ट्रीय महामार्ग-६ आणि आंतरराज्य महामार्गही विस्कळीत
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मिझोराममध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू आहे. यामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीतही वाढ होत आहे. नदीकाठच्या भागात राहणाऱ्या अनेक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले आहे. हुंथर येथे राष्ट्रीय महामार्ग ६ वर भूस्खलन झाल्यामुळे ऐझॉल शहराचा देशाच्या इतर भागापासून संपर्क तुटला आहे, भूस्खलनामुळे विविध आंतरराज्य महामार्गही विस्कळीत झाले आहेत, असेही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत सांगितले आहे.