धुळे : अंडरपासच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने
धुळे ; पुढारी वृत्तसेवा- धुळे- सोलापूर महामार्गावरील तरवाडे (ता.धुळे) येथे अंडरपास करण्याच्या मागणीसाठी आज इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने करण्यात आली. तरवाडे ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकारी गोयल यांना याबाबत निवेदन देण्यात आले. या महामार्गावरील संभाव्य अपघात टाळण्यासाठी तरवाडे येथे अंडरपास होणे गरजेचा असुन तशी मागणी यापुर्वीही वेळोवेळी करण्यात आली आहे.
धुळे चाळीसगाव राष्ट्रीय महार्गावरील तरवाडे हे पाच हजारांवर लोकसंख्या असलेले मोठे गाव आहे. तरवाडे या गावाची लोकवस्ती ही धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाचा दोन्ही बाजूस आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या एका बाजूस जि.प.मराठी शाळा, माध्यमिक शाळा, रेशन दुकान, आदी सर्व प्रकारच्या रोजच्या दैनंदिन बाबी असुन दुसर्या बाजूस वस्ती आहे. यामुळे ग्रामस्थांना वेळोवेळी राष्ट्रीय महामार्ग ओलांडावा लागतो. म्हणून अंडरपास होणे हे ग्रामस्थाचा हितासाठी महत्वाचे आहे. येथील ग्रामस्थांच्या हितासाठी व वाहनांचे होणारे अपघात टाळण्यासाठी गावकर्यांनी ग्रामपंचायत कार्यालयामार्फत दि.९ नोव्हेंबर २०११ रोजी अंडरपासची मागणी केली होती. तरवाडे येथे उड्डाणपूल, अंडरपास अथवा बायपास करण्याच्या मागणीचे निवेदन तत्कालीन धुळे जिल्हाधिकारींकडे दिले गेले होते. याविषयी वेळोवेळी पाठपुरावाही करण्यात आल्याचेही निवेदनात म्हटले आहे. यानंतर दि.३ नोव्हेंबर २०२२ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारींच्या उपस्थितीत रस्त्याची पाहणी केली गेली. ह्या पाहणी दरम्यान तरवाडे गावाचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी गावासाठी आवश्यक असणार्या अंडरपास विषयी सर्व गोष्टी विस्तृतपणे नमूद केल्या. यास आपल्या कडून सकारात्मक प्रतिसादही मिळाला व अंडरपासची मागणी मान्य करण्यात आली.
तरवाडे गावास अंडरपासची गरज आहे. वरिष्ठ स्तरावर कळवून अंडरपासची तरतूद करू, असे आश्वासनही यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाने गावकर्यांना दिले आहे. परंतु आजपर्यंत याबाबत काय झाले, याबाबत कुठल्याही गोष्टीचा खुलासा झाला नाही. या महामार्गाचे काम गतीने सुरु असुन तरवाडे येथील अंडरपासचा विषय अतिशय गांभीयनि घ्यावा व येथे अंडरपासची सोय करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे, धुळे पं.स. उपसभापती देवेंद्र माळी, सुनिल जमादार, गंगाधर चव्हाण, सागर माळी, समाधान माळी, विशाल माळी, लोकेश माळी, विवेक माळी, रोहित माळी, विनोद माळी, हर्षल वाघ, राज चव्हाण, विलास राठोड, कृष्णा माळी, योगिराज वाघ, अजय माळी, प्रविण माळी यांच्यासह तरवाडे ग्रामस्थ होते.
हेही वाचा :
Maratha Reservation : कायदेशीर सल्ला घेऊनच आम्ही मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला होता : पृथ्वीराज चव्हाण
घरी सुरू होती लग्नाची तयारी; यापूर्वीच मोठ्या भावाने उचललं टोकाचं पाऊल
Winter Session : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख अखेर ठरली
The post धुळे : अंडरपासच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने appeared first on पुढारी.
धुळे ; पुढारी वृत्तसेवा- धुळे- सोलापूर महामार्गावरील तरवाडे (ता.धुळे) येथे अंडरपास करण्याच्या मागणीसाठी आज इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने करण्यात आली. तरवाडे ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकारी गोयल यांना याबाबत निवेदन देण्यात आले. या महामार्गावरील संभाव्य अपघात टाळण्यासाठी तरवाडे येथे अंडरपास होणे गरजेचा असुन तशी मागणी यापुर्वीही वेळोवेळी करण्यात आली आहे. …
The post धुळे : अंडरपासच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने appeared first on पुढारी.