कॉपीबहाद्दर वाढले! 145 विद्यार्थ्यांवर कारवाई; राज्यात 299 गैरप्रकारांची नोंद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत 299 गैरप्रकारांची नोंद झाली आहे. त्यामध्ये कॉपी केल्याप्रकरणी 145 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच डमी विद्यार्थी परीक्षेला बसविल्याप्रकरणी म्हणजेच तोतयेगिरीच्या दोन घटना घडल्या आहेत. उत्तरपत्रिकेचे पान फाडणे, आक्षेपार्ह लेखन करणे, विनंती करणे, असे प्रकार निर्दशनास आल्याप्रकरणी 152 प्रकार, असे एकूण 299 गैरप्रकार घडल्याची माहिती अध्यक्ष शरद …

कॉपीबहाद्दर वाढले! 145 विद्यार्थ्यांवर कारवाई; राज्यात 299 गैरप्रकारांची नोंद

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत 299 गैरप्रकारांची नोंद झाली आहे. त्यामध्ये कॉपी केल्याप्रकरणी 145 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच डमी विद्यार्थी परीक्षेला बसविल्याप्रकरणी म्हणजेच तोतयेगिरीच्या दोन घटना घडल्या आहेत. उत्तरपत्रिकेचे पान फाडणे, आक्षेपार्ह लेखन करणे, विनंती करणे, असे प्रकार निर्दशनास आल्याप्रकरणी 152 प्रकार, असे एकूण 299 गैरप्रकार घडल्याची माहिती अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. कॉपी केल्याप्रकरणी सर्वाधिक 86 प्रकरणांची नोंद छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळातील परीक्षा केंद्रावर झाली आहे. त्यापाठोपाठ पुणे विभागीय मंडळात 19, नागपूर 16, लातूर 10, अमरावती 7, नाशिक 6 आणि कोकण विभागात 1 कॉपीचे प्रकार घडले आहेत.
मुंबई आणि कोल्हापूर विभागीय मंडळात एकाही कॉपी प्रकरणाची नोंद झालेली नाही. परीक्षेनंतर उत्तरपत्रिकेचे पान फाडणे, आक्षेपार्ह लेखन तसेच विनंती करणे आदी 152 गैरप्रकार उघडकीस आले आहेत. यातील सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर मंडळात 73, नाशिक 46, कोल्हापूर 15, मुंबई 12, लातूर 4, पुणे 2 अशी नोंद करण्यात आली आहे. तर नागपूर, अमरावती आणि कोकणात एकही प्रकार घडलेला नसल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, दहावी परीक्षेत पुणे आणि मुंबई विभागीय मंडळातील परीक्षा केंद्रांवर डमी विद्यार्थ्यांस परीक्षेला बसवत तोतयेगिरी केल्याचे दोन प्रकार घडले आहेत.
गतवर्षी 366 गैरप्रकार
गतवर्षी 2023 मध्ये कॉपी केल्याप्रकरणी 116, तर परीक्षेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना साहाय्य केल्याबाबत 2 प्रकरणांची नोंद झाली होती. तसेच राज्यात परीक्षेदरम्यान आणि परीक्षेनंतर असे एकूण 366 गैरप्रकार घडले होते.
हेही वाचा

PM Modi | भाजपला प. बंगालमध्ये मोठे यश मि‍ळेल, पीएम मोदींचा दावा
शरद पवारांनी ठाकरेंना आमच्यापासून तोडले, हा खेळ त्यांनीच संपवावा!
उन्हाळ्यात तोंडली ठरतात ‘सुपरफूड’!