उष्माघातासह आजारांमुळे आठ दिवसांत १६ बेवारसांचा मृत्यू

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – शहरात गेल्या अवघ्या आठच दिवसांमध्ये उष्माघातासह विविध आजारांनी त्रस्त असलेल्या 16 बेवारसांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे. या मृतदेहांवर एकाचवेळी अत्यंस्कार करण्यात आले. मात्र, त्यासाठी कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली.
शहरातील विविध भागात बेवारस नागरिकांचे मृतदेह आढळून आले आहेत. गेल्या आठ दिवसांत १६ बेवारस मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. महापालिका व पोलिस प्रशासनाने हे मृतदेह ताब्यात घेऊन ती जिल्हा रुग्णालयातील शवागारात दाखल केली. त्यानंतर त्यांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यात उष्माघात व विविध आजारांनी त्रस्त असल्याने या व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जीएम फाऊंडेशनने महापालिका आणि आरोग्य यंत्रणेकडे पाठपुरावा करून या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत.
हेही वाचा:
Monsoon Update: भारतातील ‘या’ भागात यंदाचा मान्सून दमदार; IMD ने दिली माहिती
Menstrual Hygiene Day | २८ मे रोजी मासिक पाळी स्वच्छता दिन का साजरा केला जातो?
