जगातील सर्वात उंच झाडांचे आता ब्रिटनमध्येही जंगल!

लंडन : जगाच्या पाठीवर अनेक जंगले आहेत. अ‍ॅमेझॉनच्या जंगलाला तर ‘पृथ्वीचे फुफ्फुस’ म्हटले जाते. मात्र अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील एक जंगल सर्वात ‘हट के’ आहे. हे जंगल आहे जगातील सर्वात उंच अशा ‘जायंट रेडवूड्स’चे. ‘जायंट रेडवूड्स’ ही जगातील सर्वात उंच वाढणारी झाडं आहेत. कॅलिफोर्नियात आढळणारे हे वृक्ष आता ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसू लागलेत. सुमारे 160 वर्षांपूर्वी या …

जगातील सर्वात उंच झाडांचे आता ब्रिटनमध्येही जंगल!

लंडन : जगाच्या पाठीवर अनेक जंगले आहेत. अ‍ॅमेझॉनच्या जंगलाला तर ‘पृथ्वीचे फुफ्फुस’ म्हटले जाते. मात्र अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील एक जंगल सर्वात ‘हट के’ आहे. हे जंगल आहे जगातील सर्वात उंच अशा ‘जायंट रेडवूड्स’चे. ‘जायंट रेडवूड्स’ ही जगातील सर्वात उंच वाढणारी झाडं आहेत. कॅलिफोर्नियात आढळणारे हे वृक्ष आता ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसू लागलेत.
सुमारे 160 वर्षांपूर्वी या झाडांची रोपं ब्रिटनमध्ये आणण्यात आली होती आणि अभ्यासात असं दिसून आलंय की, ही झाडं आता कॅलिफोर्नियाच्या तुलनेत बि-टनमध्ये अगदी वेगाने वाढू लागली आहेत. एका अंदाजानुसार, कॅलिफोर्नियामधील 80,000 झाडांच्या तुलनेत बि-टनमध्ये 5,00,000 रोपं आहेत. मात्र या रोपट्यांची उंची तितढलेली नाही. कॅलिफोर्निया मधील झाडं 90 मीटर उंच आहेत तर बि-टनमधील झाडांची उंची 54.87 मीटर आहे. यामागचं कारण म्हणजे या रोपट्यांची वाढ सुरू आहे. जायंट रेडवुडस् जवळपास 2,000 वर्षांहून अधिक काळ जगतात. त्यामुळे बि-टनमध्ये लावलेल्या या रोपट्यांकडे वाढीसाठी अजून भरपूर वेळ आहे.
ससेक्सच्या वेकहर्स्ट मधील डॉ. फिल विल्क्स म्हणाले की, ‘आतापर्यंत पाच लाख रोपटी रडारखाली आली आहेत. जेव्हा तुम्ही या रोपट्यांची माहिती गोळा करू लागता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की, एकूण रोपटी किती आहेत.‘ जायंट रेडवुडस्ची (सेक्वियोएडेंड्रोन गिगेंटम) रोपं बि-टनमध्ये आणण्याचं श्रेय व्हिक्टोरियन लोकांना दिलं जातं. त्याकाळी ही रोपं श्रीमंतांच्या बागेत लावली जायची. थोडक्यात ही रोपं सांपत्तिक स्थितीचं प्रतीक होती. आज या रोपट्यांचं रूपांतर भल्या मोठ्या झाडांमध्ये झालं आहे. काही झाडं हमरस्त्यांवर जोड्यांनी उभी असलेली दिसतात. ही झाडं ओळखणं देखील तेवढंच सोपं आहे.
दाट, शंकूच्या आकाराची वाढलेली ही झाडं एखादा राजमुकुट धारण केल्यासारखी वाटतात. ही झाडं बि-टनच्या वातावरणाशी कशाप्रकारे जुळवून घेतात हे पाहण्यासाठी वनस्पती शास्त्रज्ञांनी स्कॉटलंडमधील अर्गिलशायर वेकहर्स्टच्या बोटॅनिक गार्डन आणि हॅव्हरिंग कंट्री पार्क येथील 5,000 झाडांची नमुना निवड केली. त्यांनी काही झाडांची उंची आणि वजन मोजण्यासाठी लेसर स्कॅनर वापरला. झाडं न तोडता त्यांचं वजन करण्यासाठी या लेसर स्कॅनरचा वापर केला जातो. संशोधकांना असं आढळून आलं की, ज्या पद्धतीने ही झाडं त्यांच्या मूळ घरी म्हणजेच कॅलिफोर्नियामध्ये वाढतात, अगदी त्याच पद्धतीने त्यांची बि-टन मध्येही वाढ होत आहे.
थोडक्यात बि-टनचं हवामान त्यांच्यासाठी अनुकूल असल्याचं डॉ. विल्क्स सांगतात. त्यांनी पुढे सांगितलं की,‘कॅलिफोर्निया मधील वातावरण बि-टनच्या तुलनेत थंड आणि आर्द्र आहे. “बि-टनमध्ये असलेलं आर्द्र या झाडांच्या वाढीसाठी पोषक आहे. या झाडांच्या वाढीसाठी ओलावा आवश्यक असतो. ‘झाडं किती प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात हे देखील वैज्ञानिकांनी पाहिलं. ही झाडं वातावरणातील हरितगृह वायू शोषून घेतात. त्यामुळे ही झाडं मोठ्या प्रमाणावर लावल्यास हवामान बदलाचा सामना करण्यास मदत होऊ शकते.