ब्लड सँम्पलच्या हजारो नळ्या डिंभा डावा कालव्यात: नागरिकांचे आरोग्य धोक्यात
नारायणगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा : आजाराचे निदान करण्यासाठी रुग्णांचे ब्लड सँम्पल घेतलेल्या हजारो नळ्या येथील डिंभा डावा कालव्यात व कालव्याच्या कडेला अज्ञात पॅथॉलॉजी व्यावसायिकांनी टाकल्या आहेत. यामुळे येडगाव धरणातील पाणी प्रदूषित होऊन साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या प्रकाराची आरोग्य विभाग व स्थानिक ग्राम पंचायत यांनी दखल घेऊन संबंधितावर कारवाई करावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
येथील डिंभे डावा कालव्यात व कालव्याच्या कडेला रुग्णांचे ब्लड सँम्पल असलेल्या हजारो नळ्या अज्ञात व्यक्तीने टाकल्या आहेत. सद्यस्थितीत डिंभे डावा कालव्यातून येडगाव धरणात आवर्तन सुरू आहे. येडगाव धरणातील या पाण्याचा उपयोग जुन्नर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा, पारनेर या तालुक्यांना सिंचन व बिगर सिंचनासाठी होतो. येडगाव धरणात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या उपसा जलसिंचन योजना आहेत. रुग्णांचे ब्लड सॅम्पल असलेल्या नळ्या डिंभे डावा कालव्यात टाकलेल्या असल्याने या नळ्यातील रक्तामुळे येडगाव धरणातील जलाशय प्रदूषित होण्याचा धोका आहे. रक्त नमुन्याद्वारे हे विषाणू पाण्यात मिसळल्यास पाणी दूषित होऊन या पाण्याचा पिण्यासाठी वापर करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे साथीचे रोग निर्माण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
10th SSC Result 2024: दहावीचा निकाल जाहीर, नेहमीप्रमाणे.. मुलींनीच मारली बाजी
उन्हाळ्यात तोंडली ठरतात ‘सुपरफूड’!
जिबुती देशात सोडले प्रयोगशाळेत विकसित केलेले डास