उसका रथ आज भी श्रीकृष्ण ही चलाते है!; गंभीरची प्रतिक्रिया

चेन्नई, वृत्तसंस्था : ‘जिसकी मति और गति सत्य की हो, उसका रथ आज भी श्री कृष्ण चलाते है,’ अशा शब्दांत केकेआरचा मार्गदर्शक गौतम गंभीरने आपल्या संघाच्या आयपीएल जेतेपदाचे दिलखुलास वर्णन केले. गौतम गंभीरची ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली आहे. केकेआरने यंदा फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा धुव्वा उडवत अगदी थाटात आयपीएल जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर …

उसका रथ आज भी श्रीकृष्ण ही चलाते है!; गंभीरची प्रतिक्रिया

चेन्नई, वृत्तसंस्था : ‘जिसकी मति और गति सत्य की हो, उसका रथ आज भी श्री कृष्ण चलाते है,’ अशा शब्दांत केकेआरचा मार्गदर्शक गौतम गंभीरने आपल्या संघाच्या आयपीएल जेतेपदाचे दिलखुलास वर्णन केले. गौतम गंभीरची ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली आहे. केकेआरने यंदा फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा धुव्वा उडवत अगदी थाटात आयपीएल जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर काहीच कालावधीनंतर गौतम गंभीरने सोशल मीडियावर ही पोस्ट केली होती.
केकेआरच्या या धवल यशामुळे आता टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदीदेखील गौतम गंभीरच विराजमान होईल, या चर्चेला आणखी बळ आले आहे. गौतम गंभीरने आयपीएल जेतेपदानंतर बीसीसीआय सचिव जय शहा यांची भेट घेतली असल्याचे वृत्त आहे. यापूर्वी गौतम गंभीरने केकेआर संघाचा कर्णधार या नात्याने खेळत असताना संघाला जेतेपद मिळवून दिले होते. आता मार्गदर्शक या नात्यानेही त्याने संघाला आणखी एक जेतेपद मिळवून दिले आहे.