पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : मान्सून पुढील पाच दिवसांत म्हणजे शुक्रवारी अथवा शनिवारी केरळमध्ये दाखल होणार असल्याचा नवा अंदाज सोमवारी हवामान विभागाने दिला. दरम्यान, ‘रेमल’ चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीकडून बांगला देशकडे निघाले असून, त्याचा वेग मंदावला आहे. या वादळामुळे मान्सूनची दुसरी शाखा वेगाने पूर्व किनारपट्टीच्या जवळ आली आहे. त्यामुळे 1 जूननंतर संपूर्ण देशात मान्सून वेगाने प्रगती करण्याची शक्यता आहे.
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सून यंदा 19 मे
रोजीच अंदमानात आला. मात्र, बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘रेमल’ चक्रीवादळामुळे केरळची शाखा किंचित मंद झाली होती. त्याची दुसरी शाखा मागून येऊन पुढे गेली. ती आता बंगालचा उपसागर पार करून भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या जवळ आली आहे. मात्र, ‘रेमल’ चक्रीवादळाची गती कमी होताच पुन्हा केरळकडील शाखेने गती घेतली आहे. मान्सून शुक्रवारी अथवा शनिवारी केरळात येईल, असा ताजा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
दक्षिण अरबी समुद्राकडे मान्सूनची प्रगती
पुढील 5 दिवसांत केरळमध्ये मान्सून सुरू दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तो दक्षिण अरबी समुद्र, मालदीवचे उर्वरित भाग, कोमोरिन, लक्षद्वीप परिसरातील काही भागांसह केरळच्या दिशेने निघाला आहे. ‘रेमल’ चक्रीवादळामुळे मान्सूनची बंगालच्या उपसागराकडून दुसरी शाखा सरकत आता पूर्व किनारपट्टीजवळ आली आहे; तर केरळची शाखा किंचित मंदावल्याने ती 31 मेऐवजी 1 जूनपर्यंत केरळात येईल हे दाखवणारा नकाशा.
हेही वाचा
पाच वर्षांत जेवणाची थाळी 71 टक्क्यांनी महागली
छ.संभाजीनगर : भाजप पदाधिकाऱ्याच्या वाहनाच्या धडकेत दोघे गंभीर
चंद्रपूर : ताडोबात वाघिणीला अडविल्याप्रकरणी वनमंत्र्यांकडून दखल