हुश्श..! देशातील उष्णतेची लाट ओसरणार; IMD ची माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क: गेल्या काही दिवसांपासून देशात उष्णतेची लाट सुरू आहे. लोक उष्णतेमुळे हैरान झाले होते. परंतु येत्या ३ दिवसात देशातील बहुतांश भागातील उष्णतेची लाट ओसरणार ( Heatwave) असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. या संदर्भातील वृत्त ‘PTI’ने दिले आहे. Heatwave : उष्णतेची लाट हळूहळू ओसरणार आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी आज (दि.२७) …

हुश्श..! देशातील उष्णतेची लाट ओसरणार; IMD ची माहिती

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: गेल्या काही दिवसांपासून देशात उष्णतेची लाट सुरू आहे. लोक उष्णतेमुळे हैरान झाले होते. परंतु येत्या ३ दिवसात देशातील बहुतांश भागातील उष्णतेची लाट ओसरणार ( Heatwave) असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. या संदर्भातील वृत्त ‘PTI’ने दिले आहे.
Heatwave : उष्णतेची लाट हळूहळू ओसरणार
आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी आज (दि.२७) “नैऋत्य मान्सून, 2024 च्या पल्ल्याचा दुसरा टप्पा’ या विषयावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना देशातील बहुतांश भागातील उष्णतेची लाट पुढील तीन दिवसानंतर हळूहळू कमी होणार (Heatwave ) असल्याचेही त्‍यांनी स्पष्ट केले.

Expect relief from heat wave in northwest India and central parts of country after three days: IMD chief Mrutyunjay Mohapatra
— Press Trust of India (@PTI_News) May 27, 2024

गुरुवारपासून उष्णतेची लाट ओसरणार
वायव्य भारत आणि देशाच्या मध्यभागी उष्णतेच्या लाटेपासून तीन दिवसांनंतर आराम मिळण्याची अपेक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर आणि वायव्य भारतातील बहुतांशी राज्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहेत. दरम्यान पुढील तीन दिवसांनंतर दिल्ली, राजस्थान, हरियाणा या वायव्य आणि मध्य भागांमध्ये उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळणार आहे. गुरुवारपासून (दि.३० मे) उष्णतेची लाट कमी (Relief from heat wave) होण्यास सुरुवात होईल, असेही IMD प्रमुख मृत्युंजय मोहापात्रा यांनी म्हटले आहे.
Heatwave : बंगालच्या किनारपट्टी भागात मुसळधार
यंदा संपूर्ण देशात पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज दि.२७ मे रोजी पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरील भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तर ईशान्य प्रदेशात मंगळवार २८ मे पर्यंत अत्यंत मुसळधार पाऊस पडेल, असे देखील भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

A Virtual Press Conference On “Second Stage of Long-Range Forecast of Southwest Monsoon, 2024” to be chaired by Dr. Mrutyunjay Mohapatra, Director General of Meteorology, IMD at 04:00PM today on 27th May, 2024.
Watch Live : https://t.co/kSYJ1X2Yzf pic.twitter.com/ZlOke9uftu
— India Meteorological Department (@Indiametdept) May 27, 2024

येत्या ५ दिवसांत ‘मान्सून’  केरळमध्ये होणार दाखल
येत्या ५ दिवसांत केरळमध्ये मान्सून ( Monsoon Update) दाखल होण्याची शक्यता आहे. यासाठी लवकरच अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने X अकाऊंवरून दिले आहे.
दरवर्षी १ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो. परंतु नेहमीपेक्षा एक दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची अधिक शक्यता यापूर्वी वर्तवली होती. यानुसार शुक्रवार ३१ मे रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन (Monsoon 2024 Update) होणार असल्याची शक्यता यापूर्वी भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली होती.
हेही वाचा:

Monsoon Update | ‘मान्सून’साठी पोषक वातावरण, लवकरच केरळमध्ये धडकणार
Southwest Monsoon | मान्सून दक्षिण अरबी समुद्रात दाखल, ‘या’ राज्यांत मुसळधारेचा इशारा
Monsoon Update : मान्सून लवकरच आग्नेय अरबी समुद्रात होणार दाखल; दक्षिण भारतात अतिवृष्टी