बीड: कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकरांचा तलावात बुडून मृत्यू
आष्टी: Bharat Live News Media वृत्तसेवा : तालुक्यातील पिंपळगाव घाट गावामध्ये रहिवाशी वैष्णवी शंकर घोडके या त्यांच्या मुलांसोबत म्हणजे समर्थ घोडके सोबत गावालगत केळ पिंपळगाव व पिंपळगाव घाट या दोन्ही शिवाराच्या मधोमध असणाऱ्या तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या होत्या. कपडे धुत असताना मुलगा समर्थ तलावामध्ये बुडत असताना पाहुन त्याची आई वैष्णवी यांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. परंतु, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात या दोन्ही मायलेकरांचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दि.२७) दुपारी ३ च्या सुमारास घडली.
या घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिस ठाण्याचे सपोनि मंगेश साळवे, उपनिरीक्षक भडके, केदार, गर्जे, पैठने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा
बीड : परळी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू
बीड : मांजरा प्रकल्पाच्या आधुनिकीकरण कामासाठी निधी मंजूर
बीड: बोरगाव येथे वर्चस्व वादातून वाळू माफियांच्या दोन गटांत राडा